शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २0 लाख रूपयांचा प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:34 IST

जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २0 लाख रूपये आहे. गुटखा जप्तीची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचे विशेष पथक शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना, नवीन बैदपुरा मरघट रोड परिसरात एका ट्रकमधून दोन मालवाहू वाहनांमध्ये काही माल भरीत असल्याचे दिसले. पोलिसांची चौकशी केल्यावर प्रतिबंधीत गुटखा असल्याचे समोर आल्याने, पोलिसांनी गुटखा, पानमसाला जप्त करून आठ जणांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २0 लाख रूपये आहे. गुटखा जप्तीची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर हे शुक्रवारी गस्तीवर असताना, त्यांना मासुम शाह चौकात एचआर ३८-डब्लू-६0४६ क्रमांकाच्या ट्रकमधून एमएच ३0-बीडी-१६८७ आणि एमएच ३0-बीडी-७८५ या मालवाहू वाहनांमध्ये काही पोते भरताना दिसून आले. पोलिसांनी ट्रकमधील मालाची पाहणी केली असता, त्यात प्रतिबंधीत पानमसाला व गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकचालक लखन सिताराम बघेल(२६ रा. मोहणा ग्वाल्हेर), क्लिनर लाखन द्वारका बघेल(२४ रा. मोहणा ग्वाल्हेर), मालवाहू वाहनाचे चालक शेख सलमान शेख हुसैन(२१ रा. हाजी नगर शिवणी), आदिल खान फिरोज खान(२३ रा. जुना बैदपुरा), तन्वीर खान हसन खान(३५ रा. जुना बैदपुरा), तबरेज खान युनूस खान(२२ रा जुना बैदपुरा), सुबेदार खान रसुउल्ला खान(३0 रा. हाजी नगर शिवणी) आणि जावेद खान रसुल खान(३३ रा. हाजी नगर शिवणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्रतिबंधीत गुटखा, सुगंधीत तंबाखूचे ३0 पोते(किंमत ९ लाख रूपये) आणि पानमसाला व सुगंधीत तंबाखूचे ३५ पोते(१0 लाख ५0 हजार रूपये), पानमसाल्याचे एक पोते(किंमत ३१ हजार) असा एकूण १९ लाख ८१ हजार रूपयांचा गुटखा आणि एक ट्रक(३0 लाख २0 हजार रूपये), दोन मालवाहू वाहने(१0 लाख रूपये) असा मुद्देमाल जप्त केला. हा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूचा माल सिंधी कॅम्प कालू सेठ नामक व्यक्ती आणि जुना बैदपुऱ्यातील वहिद खानचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे पांडे नामक व्यक्तीच्या मार्फत गुटख्याचा माल ट्रकमधून उतरवित होते. हा संपूर्ण माल अन्न व औषध प्रशासनाकडे पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस