शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २४ अतिरिक्त शिक्षकांपैकी नऊ जणांचे जिल्हय़ाबाहेर समायोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:31 IST

अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले.

ठळक मुद्देशिक्षकांना न्यायाची प्रतीक्षाशिक्षण संस्थांचा रुजू करून घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. शिक्षण उपसंचालकांनी जिल्हय़ातील २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हय़ाबाहेरील शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले खरे; परंतु या शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे, असा प्रश्न अतिरिक्त शिक्षकांना पडला आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाने चार महिन्यांपूर्वी जिल्हय़ातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची आरक्षण व विषयनिहाय माहिती मागविली होती. त्यानुसार जिल्हय़ात ६६ अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. या ६६ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा स्तरावर ऑनलाइन पद्धतीने समायोजन करण्याचा कार्यक्रम आखला. प्रारंभी शिक्षणाधिकार्‍यांनी ६६ पैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन केले आणि २४ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा विषय अमरावती विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आला. जिल्हय़ातील अनेक शाळांमध्ये या शिक्षकांच्या आरक्षण व विषयानुसार रिक्त पदे असल्यामुळे त्यांनी जिल्हय़ातील शाळांमध्ये समायोजन करण्याची विनंती केली होती; परंतु त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून आणि नियमांना डावलून, शिक्षण उपसंचालकांनी २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे बुलडाणा जिल्हय़ातील विविध शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले; परंतु या शिक्षण संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकांची गोची झाली आहे. आता कुठे जावे, असा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत. जिल्हय़ातील अनेक शाळांमध्ये आरक्षण व विषयानुसार शिक्षकांची पदे रिक्त असताना, या शिक्षकांना जिल्हय़ाबाहेर पाठविण्याचे प्रयोजनच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हय़ातील शाळांमध्येच या शिक्षकांचे समायोजन व्हायला हवे, असा शिक्षकांचा आग्रह आहे. अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होत असताना शिक्षक संघटना त्याविषयी बोलायला तयार होत नाहीत. त्यामुळे दाद मागावी कुणाकडे, अशा विवंचनेत अतिरिक्त शिक्षक सापडले आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरTeacherशिक्षकTransferबदली