शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो आता तरी सुधरा, अन्यथा जप्त वाहने नष्ट होतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 10:42 IST

पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कर्मचाºयांसह धडक मोहीम सुरू केली आहे.

अकोला : ‘कोरोना’ या तीव्र संसर्गजन्य विषाणूचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच अकोलेकर मात्र रस्त्यावर विनाकारण दिवस-रात्र फिरत असल्याने त्यांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत; मात्र तरीही न सुधारण्याच्या मनस्थितीत असलेल्या अकोलेकरांची रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने अकोलेकरांना आता तरी सुधरा, असे आवाहनच पोलिसांनी केले आहे. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पोलिसांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये जप्त केलेले वाहन नष्ट (स्क्रॅप) करण्याचा अधिकार पोलिसांना असून, यापुढील पाउल तेच राहणार असल्याचेही आता पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.अकोला जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण नसला तरी ६० पेक्षा अधिक कोरोना संदिग्ध असलेल्यांचे अहवाल प्राप्त झाले नसून, त्यांच्यापैकी कुणालाही पॉझिटिव्ह आढळल्यास त्यापासून अकोलेकरांना धोका आहे. अकोला शहर व जिल्हा कोरोनामुक्त राहावा म्हणून सर्व शासकीय यंत्रणा रात्रं-दिवस काम करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवणे हा एकमेव उपाय असल्याने त्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे; परंतु संचारबंदी असूनही जीवनावश्यक वस्तू व अतिआवश्यक रुग्णांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन बरेच नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर घेऊन विनाकारण फिरत असल्याने ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत; मात्र त्यानंतरही जवळच्या चौकात भाजी आणायलासुद्धा वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करण्याचे प्रमाण वाढतेच आहे. तर वाहने स्क्रॅप करण्याचा अधिकारबाहेर फिरणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कंबर कसली असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी कर्मचाºयांसह धडक मोहीम सुरू केली आहे. विनाकारण वाहने बाहेर फिरविणाºयांचा ओघ तत्काळ कमी न झाल्यास कार, दुचाकी, तीनचाकी जप्त करून ती नष्ट करण्याचा अधिकार पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्राप्त असून, हेच शस्त्र आता उगारण्यात येणार असल्याची माहिती आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय फुल्ल झाल्याने आता शास्त्री स्टेडियमवर जप्त केलेली वाहने ठेवण्यात येणार आहेत. गत सहा दिवसांमध्ये ३५० पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. अकोला जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व विनाकारण आपली वाहने घेऊन रस्त्यावरील गर्दी वाढवू नये.- गजानन शेळकेपोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, अकोला. 

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस