शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांचा ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:44 IST

मजूर संघटना संयुक्त कृती समितीच्या पुढाकारात ९ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

अकोला : असंघटित कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मजूर संघटना संयुक्त कृती समितीच्या पुढाकारात ९ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.२८ प्रकारच्या नोंदणीकृत मजुरांच्या हिताच्या योजना असल्याचा शासन गोषवारा करीत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे मिळविणे, दिवसभर कार्यालयात उभे राहणे, विशेष म्हणजे कार्यालयात पाण्याची सुविधा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अधिकाऱ्यांची मजुरांप्रती चांगली वागणूक नाही. या सर्व बाबी लक्षात घेत मजुरांनी काही ठळक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर रोजी शेकडो कामगारांचा मोर्चा निघणार आहे.कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक महिन्यात शासन निर्णयानुसार वाटप करावे, अकोला कार्यालयात नूतन नोंदणी सुरू ठेवावी, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कार्यालय देण्यात यावे, कोणत्याही दोन पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशा कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात असंघटित कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन