शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 13:38 IST

टीईटी उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे. शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांनी ‘टीईटी’ परीक्षा तीन संधीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु शेकडो शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अकोला : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांनाशिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे. शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांनी ‘टीईटी’ परीक्षा तीन संधीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु शेकडो शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण न केलेल्या प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा आदेश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिला आहे.राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील प्राथमिक शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे २0१३ मध्ये बंधनकारक केले होते. १३ फेब्रुवारी २0१३ नंतर खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या; परंतु टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या, परीक्षा न दिलेल्या शिक्षकांना २0१६ च्या शासन निर्णयानुसार प्रथम तीन संधीनुसार परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु त्यानंतरही राज्यातील हजारो शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. खासगी शिक्षण संस्था, अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक शाळांमधील हजारो शिक्षकांनी टीईटी परीक्षा तीन संधीमध्ये उत्तीर्ण केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा शिक्षकांची प्राथमिक शिक्षण विभागाने गणना करावी आणि त्यांची संख्या निश्चित करण्यात यावी, त्यानुसार त्यांच्या शाळांना ही माहिती देण्यात यावी आणि त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, त्यासंबंधीचा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करण्याचा आदेशही शिक्षण सहसंचालकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

अकोला जिल्ह्यात २0१३ नंतर खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक पदासाठी नवीन मंजुरी देण्यात आली नाही; परंतु शिक्षण विभागामार्फत शोध घेऊन कोणी असा शिक्षक आहे का, तीन संधीनंतरही त्यांनी टीईटी उत्तीर्ण केलेली नाही. याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.- देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी,प्राथमिक, जि.प. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक