शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:48 IST

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते.

अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. सदर उंटांना पातूरपोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.राजस्थान मधुन तेलगंणा तथा आन्ध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे कत्तलीकरीता ५८ उंटाना १२ डिसेंबर रोजी नेण्यात येत होते. चार राज्यातील पोलीसांच्या हातावर तुरी देउन हे दलाल उंटाचा तस्करीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षे पासुन करीत आहेत. अनेक वेळा उंटाचे कळप हे तेलगंणा आंध्र प्रदेश राज्यात जात असताना त्यांची साधी चौकशी सुध्दा केली जात नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा गोरखधंदा सुरु असल्याने याची तस्करी करणारे प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनेज करीत असल्याचे वास्तव आहे. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व गौरक्षण चवळवळीत कात करीत असलेल्या कार्यकर्त्यांनी या कळपावर पाळत ठेउन त्यांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना दिली होती. यावरुन सदरचा कळप राज्यस्थान वरुन हैद्राबादला कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या माहितीवरुन हैदराबाद येथील पशु संरक्षण समीतीचे वण्य संरक्षण विशेष अधीकारी सुरेंद्र भंडारी, दीनेश अपलीया , महीप जैन यांनी पातुर पोलिसांना सोबत घेउन पकडला होता. त्यानंतर विजय बोरकर यांनी या प्रकरणाची पातुर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पातुर पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास प्रचंड वेळाकाढूपणा करीत या तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वरीष्ठ स्तरावरुन दबाव आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे उंट राजस्थानमधून चोरी करून आणल्याचे तर काही उंट खरेदी करून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील भवरलाल व वक्ताराम यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सदर उंट राजस्थानमध्ये परत पाठविण्यासाठी न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने आदेश दिले असून सदर ५८ उंटांना राजस्थानमध्ये परत पाठविण्यात येत आहे.उंट हा अतिसंरक्षीत प्राणी असतांनाही कत्तलीसाठी वाहतुक होत असल्याचे उघड झाले आहे. मात्र या उंटांना जीवनदान देण्यासाठी संजय वाघमारे तसेच वनराई गोशाळा अध्यक्ष श्रीकांत बोरकर यांनी विशेष मदत केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसPaturपातूर