शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट! पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज, शेतकरी धास्तावला

By रवी दामोदर | Updated: April 7, 2024 19:51 IST

अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार दोन दिवस ढगाळ हवामान दिसून आले.

अकोला: जिल्ह्यात शनिवार, रविवार दोन दिवस ढगाळ हवामान दिसून आले. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार, दि.८ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट दिला असून,  पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या धास्तीने सोंगणीला आलेल्या पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला अपेक्षित पाऊस पडला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने यावर्षी सिंचन प्रकल्प, धरण, ओेढे, नद्या, नाले, कोरडे पडले आहेत. आता उन्हाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ यामुळे आंबा, फळपिकांचे नुकसान हाेण्याची माेठी शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्वारीचे पीक सोंगणीला, शेतकऱ्यांचा जीव टांगणीलाजिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. सध्या शेतशिवारात रब्बी ज्वारी सोंगणीला आली असून, शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यात अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यंदा रब्बी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिल्याचे चित्र असून, यंदा प्रथमच पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस