शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अभाविप करणार आज शिक्षणमंत्र्यांविरोधात निदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:29 IST

भाजप सरकार विरुद्ध विरोधी पक्ष मैदानात उतरले असताना, आता संघ परिवारातील महत्त्वाची संघटना असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसुद्धा भाजप सरकारविरोधात उभी ठाकली आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धती, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक्रियेबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप करीत, अभाविपने भाजपला घरचा अहेर दिला आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक धोरणांविषयी शासन उदासीन अभाविपचा भाजपाला घरचा अहेर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजप सरकार विरुद्ध विरोधी पक्ष मैदानात उतरले असताना, आता संघ परिवारातील महत्त्वाची संघटना असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसुद्धा भाजप सरकारविरोधात उभी ठाकली आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धती, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक्रियेबाबत शासन उदासीन असल्याचा आरोप करीत, अभाविपने भाजपला घरचा अहेर दिला आहे. शासनातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरुद्ध अभाविपने राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये ११ डिसेंबर रोजी निदर्शने करणार आहे. अभाविप ही अप्रत्यक्षरीत्या भाजपाप्रणित विद्यार्थी संघटना असल्याचे नेहमीच म्हटल्या जाते. अभाविपचे अनेक नेते भाजपात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. सध्या विरोधी पक्ष भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शेतकरी, जनतेमध्ये भाजप सरकारविषयी नाराजी असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. त्यात शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी शासन उदासीन असल्याचे म्हणत, संघ परिवाराशी संबंधित अभाविपने नाराजी व्यक्त केली. अभाविपने भाजपविरोधी भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धतीने, शिष्यवृत्ती, शैक्षणिक धोरणातील निर्णय प्रक्रिया आदींबाबत शासन उदासीन दिसून येत आहे. अभाविपने यासंदर्भात वेळोवेळी निवेदनातून शासनाला कळविले होते; परंतु शासनाने त्याची दखलसुद्धा घेतली नाही. एकंदरितच भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर अभाविपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  छात्रसंघ निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्यात याव्या. सेमिस्टर पॅटर्न बंद करावा, विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती द्यावी, एक खिडकी शिष्यवृत्ती योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी अभाविप ११ डिसेंबर रोजी विदर्भातील सर्वच जिल्हय़ांमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करणार आहेत, अशी माहिती अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री विक्रमजित कलाने, महानगरमंत्री वशिष्ठ कात्रे, हर्षल अलकरी यांनी दिली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरagitationआंदोलन