शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भाजपमधील असंतुष्टांचा विरोधकांना ‘बुस्टर डोस’

By admin | Updated: May 6, 2016 02:15 IST

अकोला मनपात भाजपच्या डोकेदुखीत भर; पक्षाची शिस्त हरवली कोठे?

आशिष गावंडे / अकोलामहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघ्या आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये विकासकामांचा निपटारा करण्यापेक्षा निधीवाटपावरून अंतर्गत कलह शिगेला पोहोचले आहेत. भाजपमधील काही असंतुष्ट नगरसेवक चक्क विरोधी पक्ष काँग्रेसला हाताशी धरून पक्षाला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नसल्याने शिस्तप्रिय पक्ष म्हणवून मिरवणार्‍या भाजपची पुढील वाटचाल कठीण असल्याचे चित्र दिसत आहे. ह्यअच्छे दिनह्णचे स्वप्न दाखवत लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत, केंद्रासह राज्यात सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांच्या कालावधीसाठी का होईना, भाजपने शिवसेनेच्या मदतीने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. त्यापूर्वी केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे निधीवाटपातून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून होत असे. काँग्रेसच्या धोरणांमुळे अपुरा निधी मिळत असल्याने विकासकामांना विलंब होत असल्याची सबब भाजपकडून नेहमीच पुढे केली जात होती. आता चित्र पूर्णत: बदलले आहे. मनपासह राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असली तरी महापालिकेत निधीवाटपावरून भाजपमध्ये सुरू असलेल्या वादंगामुळे पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. सुरुवातीला दीड वर्षांपर्यंत महापौर उज्ज्वला देशमुख विरुद्ध सर्व नगरसेवक असा सामना रंगला असतानाच, आता पक्षात काही असंतुष्ट, महत्त्वाकांक्षी नगरसेवकांचा गट उदयास आला आहे.

होय, भाजप नगरसेवक आमच्या संपर्कात!सत्तापक्षातील पदाधिकारी निधीवाटपात स्वपक्षीय नगरसेवकांवरसुद्धा अन्याय करीत आहेत. अन्यायाची भावना असल्यामुळे भाजपचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला जात आहे. पक्षाच्या अडचणीत वाढसत्तापक्ष भाजपला विकासकामांपेक्षा बदनामीचा सामना करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. स्वपक्षीय नगरसेवकांनीच छुपी मोहीम उघडली असून, याचा विरोधकांकडून राजकीय फायदा घेतला जात असल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.