शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

शेतकर्‍यांसाठी खुले करणार नवतंत्रज्ञान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:12 IST

अकोला: नऊ हुतात्मा, अनेक जण जायबंदी झाल्यानंतर २0 ऑक्टोबर १९६९ साली अकोल्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मिळाले. हा दिवस कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी येथे साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकर्‍यांना बघण्यासाठी खुले केले जाते.

ठळक मुद्देडॉ. पंदेकृविचा स्थापना दिवसविदर्भस्तरीय शेतकरी शिवारफेरी २७ ऑक्टोबरपासून

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नऊ हुतात्मा, अनेक जण जायबंदी झाल्यानंतर २0 ऑक्टोबर १९६९ साली अकोल्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मिळाले. हा दिवस कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी येथे साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संशोधन, तंत्रज्ञान शेतकर्‍यांना बघण्यासाठी खुले केले जाते. यावर्षी २५ ते २७ ऑक्टोबरपर्यंंत कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी याच विदर्भस्तरीय शेतकरी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.अकोल्याला कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी या भागात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांंवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात नऊ जण शहीद झाले, अनेक जण कायमचे जायबंदी झाल्यांतनर येथे कृषी विद्यापीठ देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २0 ऑक्टोबर १९६९ साली येथे विद्यापीठ स्थापन झाले. या ४८ वर्षांंच्या काळात कृषी विद्यापीठाने अनेक नवी संशोधन, तंत्रज्ञान विकसित केली असून, त्याचा शेतकर्‍यांना लाभ होत आहे. संशोधनाची प्रक्रिया निरंतर सुरू  आहे. हेच नवे आधुनिक तंत्रज्ञान, कृषी अवजारे, कृषी विद्यापीठाचे विविध मॉडेल शेतकर्‍यांना बघण्यासाठी खुले करण्यात येते. यावर्षीही कृषी विद्यापीठाने शिवारफेरीची जय्यत तयारी केली आहे.या शिवारफेरीत कापूस, लिंबूवर्गीय फळे, ज्वारी, कडधान्य, तेलबिया, कोरडवाहू शेती, औषधी व सुगंधी वनस्पती, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय आदी विभागांसह डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, शेती मशागतीची यंत्रे व अवजारे, कापणी पश्‍चात तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला लागवड तंत्रज्ञानासह काळाची गरज बनलेल्या सेंद्रिय शेती विभागांना या शिवारफेरीदरम्यान भेटी देता येणार असून, शेतीविषयक तांत्रिक चर्चासत्राचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता शिवार फेरीचे उद्घाटन करतील.

शिवारफेरीचा जिल्हानिहाय कार्यक्रम  २५ ऑक्टोबर रोजी बुलडाणा, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्हा, २६ ऑक्टोबर रोजी वाशिम, अमरावती, नागपूर व यवतमाळ जिल्हा तर २७ रोजी अकोला, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी या शिवारफेरीत सहभागी  होऊ शकतात. या शिवारफेरीमध्ये सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची नोंदणी दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंंंत शेतकरी सदन (विद्यापीठ क्रीडांगणासमोर) अकोला येथे नाममात्र शुल्क रु. १0 भरून करता येईल.

कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त यावर्षीही विदर्भस्तरीय शेतकरी शिवारफेरीचे आयोजन करयात आले असून, शेतकर्‍यांना लाभ घेण्यासाठी संशोधन खुले केले जाईल. तसेच कृषी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. यावर्षी दिवाळी सण असल्याने शिवारफेरी २0 ऑक्टोबरऐवजी २५ ऑक्टेाबर रोजी सुरू  होणार आहे.- डॉ.डी.एम. मानकर,संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.