शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विरोधकही उतरले शेतकरी आंदोलनात; यशवंत सिन्हा यांना मिळतोय व्यापक पाठिंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 02:35 IST

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून  माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर  यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्‍या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले.

ठळक मुद्देकाँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, मनसे, आपचा पाठिंबा, जिल्हाभरात ‘रास्ता रोको’ 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून  माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर  यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्‍या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले.  मंगळवारी  आंदोलन स्थळाला भाजपा खासदार नाना पटोले यांनी दुपारच्या सुमारास भेट देऊन शेतकर्‍यांना  संबोधित केले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं, शिवसेना, आप, मनसे या पक्षांनीही  सिन्हा यांना पाठिंबा दर्शवत पोलीस मुख्यालयात घोषणाबाजी केली. आंदोलनाना पाठिंबा म्हणून  जिल्ह्यात बोरगाव मंजू, कोळंबी आणि राजंदा फाटा येथे विविध राजकीय पक्ष, संघटना व शे तकर्‍यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अकोट व बाळापूर, मूर्तिजापूर येथे  प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

आमदार बच्चू कडू यांनी साधला संवाद‘कासोधा’ परिषदेला उपस्थित राहू न शकलेले आ. बच्चू कडू मंगळवारी रात्री अकोल्यात  दाखल झाले. त्यांनी सिन्हा यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी पोलीस मुख्यालयातील शेतकर्‍यांच्या आंदोलनात दुसर्‍या दिवशीसुद्धा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी  सहभाग घेतला आणि भाजप सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मंगळवारी दुपारी  काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी यशवंत सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी  आ. बबनराव चौधरी, माजी आ. अँड. नातिकोद्दीन खतीब, जिल्हा महासचिव प्रकाश तायडे,  मनपा विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण, राजेश भारती, निखिलेश दिवेकर, प्रदेश प्रवक्ता सुधीर  ढोणे, अंशुमन देशमुख, अनंत बगाडे, अविनाश देशमुख, राजेश राऊत, हरीश कटारिया,  नगरसेविका विभा राऊत, सुषमा निचळ, सीमा ठाकरे, इरफान मोहम्मद, प्रदीप वखारिया, सागर  कावरे, आकाश कवडे, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र गवई, प्रशांत भटकर, मोईन खान, महेमुद खान  पठाण, विजय मुळे, मो. युसूफ, वर्षा बडगुजर, राजू इटोले आदींनी आंदोलनात सहभागी होऊन  घोषणाबाजी केली. 

तुषार गांधींनी साधला संवाद  महात्मा गांधी यांचे पणतू व प्रख्यात गांधीवादी साहित्यिक तुषार गांधी यांनी पोलीस मुख्यालयात  यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा  दर्शवित आंदोलन अहिंसक मार्गाने सुरु ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मनसेचे कार्यकर्ते मैदानातशेतकरी आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सहभागी नोंदविला. मनसेचे  आदित्य दामले, पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, रणजित राठोड, ललित यावलकर,  सचिन गव्हाळे, शिवाजी पटोकार, रवींद्र फाटे, सतीश फाले, चंदू अग्रवाल, राजेश बाळंखे  पोलीस मुख्यालयात दिवसभर ठिय्या देऊन होते. 

भारिपचा आंदोलनात सहभागशेतकरी जागर मंचाच्या आंदोलनात भारिप-बमसंचे माजी आ. हरिदास भदे, जिल्हा कार्याध्यक्ष  काशीराम साबळे, जि.प. उपाध्यक्ष जमीरउल्ला खान, जि.प. सदस्य प्रतिभा अवचार, शेख  साबीर, अरुंधती सिरसाट, नगरसेविका किरण बोराखडे, अशोक सिरसाट, गजानन गवई, प्रदीप  वानखडे, बुद्धरत्न इंगोले, राजुमिया देशमुख, विकास सदांशिव, मनोहर शेळके, सचिन शिराळे,  योगेश किर्तक, रणजित वाघ, अमोल सिरसाट आदी सहभागी झाले होते. 

डॉक्टरांचाही सहभागशेतकरी आंदोलनामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ.  अमोल रावणकर, छावाचे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे आदींनी भेट दिली. 

नाफेडच्या निकषांचीच चर्चा शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकर्‍यांमध्ये दिवसभर नाफेडच्या क्लिष्ट निकषांची चर्चा  सुरु होती. अनेक शेतकर्‍यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची कशी अडवणूक करण्यात  आली, याचे किस्से सांगितले.  

दुसर्‍या दिवशीही नाकारले प्रशासनाचे जेवणआंदोलनकर्त्यांच्या जेवणासाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था दुसर्‍यादिवशीही शेतकर्‍यांनी  नाकारली. दुपारी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभय पाटील यांनी तर  संध्याकाळी संग्राम गावंडे व  युवराज गावंडे यांनी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूBabanrao Chaudharyबबनराव चौधरीAkola cityअकोला शहरFarmerशेतकरी