शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 13:09 IST

अकोला: राज्यातील पाच जिल्हा परिषदांना दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्याने एका महिन्यात निवडणूक कार्यक्रम लावून नवीन जिल्हा परिषद, पंचायत समिती अस्तित्वात आणा, असा आदेश सर्वोेच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील पाच जिल्हा परिषदांना दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्याने एका महिन्यात निवडणूक कार्यक्रम लावून नवीन जिल्हा परिषद, पंचायत समिती अस्तित्वात आणा, असा आदेश सर्वोेच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यावर पुढील सुनावणी २२ आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी आरक्षित जागांच्या ठरलेल्या निश्चित संख्येनुसारच आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, त्याबाबत उच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांवर कोणताही निर्णय घेऊ नये, असेही न्यायालयाने बजावले आहे.सर्वोच्च न्यायालयात रवींद्र पारशी पराडके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १० जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विविध निरीक्षणे नोंदवली. त्यानुसार जिल्हा परिषद बरखास्त करण्याचेही राज्य शासनाला बजावले. शासनाने १८ जुलै रोजी जिल्हा परिषद, पंचायत समित्या बरखास्त केल्या. तसेच पाच जिल्हा परिषदांचा कारभार सुरू ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समित्यांसाठी गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्ती दिली. शासनाच्या या आदेशावरही शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उपस्थित मुद्यांची दखल घेत न्यायालयाने राज्याच्या निवडणूक आयोगाला विविध निर्देश दिले. त्यामध्ये राज्यातील मुदत संपलेल्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करा, त्यामध्ये कोणताही विलंब व्हायला नको, निकालाच्या दिवसापासून एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी. दरम्यानच्या कालावधीत उच्च न्यायालयाने या प्रक्रियेसंदर्भात दाखल याचिकेवर दिलेला निर्णय अमलात येणार नाही. तसेच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल होणाºया प्रकरणांत कोणताही अंतरिम आदेश दिला जाऊ नये, आधी दिला असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा या आदेशानुसार तो अमलात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यानच्या काळात आरक्षणाच्या मुद्यावर दुरुस्ती प्रक्रिया करण्यास राज्य शासनाला मुभा आहे; मात्र त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रतीक्षा करण्याची गरज नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या स्थितीनुसारच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, राज्यघटनेनुसार निवडणूक प्रक्रिया आयोगाने पूर्ण करण्याचे न्यायालयाने म्हटले आहे.आयोगाला आरक्षणाचा अडसर नाहीस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाच्या तरतुदीत बदल करण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे ती बाब निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या आड येऊ शकत नाही. शासनाला बदल करण्याची संधी आहे. वेळेत बदल न झाल्यास आहे त्या स्थितीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय