शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मंदिरे उघडी करा, अन्यथा एक लाख वारकरी पंढरपुरात ठिय्या देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:59 IST

पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी येथे दिला.

अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता ‘अनलॉक’मध्ये मंदिरे उघडी करून, मंदिरांमध्ये किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील १ लाख वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी येथे दिला.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत ‘लॉकडाऊन’मध्ये राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता ‘अनलॉक’मध्ये सर्व काही सुरू होत असताना, राज्यातील मंदिरे मात्र बंद आहेत. मंदिरे उघडी करून, किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन, उपोषणे केली; मात्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे सरकारने वारकऱ्यांविषयी झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप गणेश महाराज शेटे यांनी केला. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची तारीख निश्चित करून, मंदिरांमध्ये किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यासंदर्भात सरकारने २६ आॅगस्टपर्यंत वारकºयांना लेखी पत्र द्यावे, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील १ लाख वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असून, या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होतील, असेही गणेश महाराज शेटे यांनी सांगितले. 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर