शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ४२ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:33 IST

पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

- संतोष येलकरअकोला : सरकारने शेतकºयांना कर्जमाफी जाहीर करून दीड वर्षांचा कालावधी उलटत असताना, कर्जमाफीस पात्र शेतकºयांपैकी पश्चिम विदर्भातील ४२ टक्के शेतकºयांनाच बँकांमार्फत आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी १३ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गतवर्षी राज्यातील थकबाकीदार शेतकºयांसाठी सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडून बँकांना निधीदेखील वितरित करण्यात आला; मात्र कर्जमाफी जाहीर होऊन दीड वर्षांचा कालावधी उलटून जात असताना, कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांपैकी आतापर्यंत सरासरी ४२ टक्केच शेतकºयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचला असून, उर्वरित शेतकरी अद्यापही कर्जमाफी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; समस्या मांडणार!कर्जमाफी योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने, या मुद्यावर आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शेतकºयांच्या समस्या मांडणार असून, कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.शेतकरी अडचणीत; व्याजाने पैसे घेण्याची वेळ!दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकºयांवर बाजारातून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कर्जमाफीस पात्र सर्व शेतकºयांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याची गरज आहे. शेतकºयांनी घेतलेल्या खासगी कर्जापोटी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी वसुलीही बंद केली पाहिजे, असे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीKishor Tiwariकिशोर तिवारी