शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा धरणात ३.३१ टक्केच साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:30 IST

अकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ ३.३१ टक्केच जलसाठा शिल्लक असून, जिवंत जलसाठ्यात वेगाने घट होत असल्याने नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर ८ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. यावषीही अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने धरणांतील जलसाठ्याची पातळी खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ३४ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली होती. तथापि, पावसाळ््याचे दोन महिने संपूनही काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नसल्याने धरणात पिण्यासाठी पूरक जलसाठा उपलब्ध झाला नाही. तर पातूर तालुक्यातील निर्गुणा व मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात शून्य टक्केच जलसाठा आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजमध्ये केवळ ०.३१ टक्के म्हणजे शून्य टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १०.४४ टक्के साठा आहे. तेल्हारा तालुक्यातीन वान धरणातही २५.१९ टक्केच साठा शिल्लक आहे.महापालिकेने पाण्याचे नियोजन केले आहे. पाच दिवसांनी एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस जर लांबला तर मात्र पुन्हा पुनर्नियोजन करावे लागणार असल्याचे संकेत आहे; पण पाऊस येईल, धरण पाण्याने भरेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

मृत जलसाठा११ दलघमी!

  •  या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा आहे. असे असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे.
  •  सध्या उपलब्ध जिवंत जलसाठा जुलै महिना पार करेल. त्यानंतर मात्र मृत जलसाठा उपसावा लागणार.
  •  यासाठीची तयारी महापालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे.

काटेपूर्णा धरणात उपलब्ध जलसाठ्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास हा जलसाठा आणखी ३५ ते ४५ दिवस पुरू शकतो.- चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई