शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील जलसाठ्यात वेगाने घट; २९ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:38 IST

अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

अकोला: वऱ्हाडातील(पश्चिम विदर्भ) धरणांमधील जलसाठ्यात वेगाने घट होत असून, बाष्पिभवनाचा वेगही वाढत असल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पाच जिल्ह्यात आजमितीस केवळ २९.९५ टक्केच जलसाठा शिल्लक असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरणातील जलसाठा शून्यावर पोहोचला आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघु प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये आजमितीस १० फेब्रुवारीपर्यंत केवळ २९.९५ टक्के जलसाठा शिल्लक होता. मागीलवर्षी वऱ्हाडात पाऊस कमी झाल्याने जलसाठ्यात अपेक्षित साठा झाला नसल्याने आता उन्हाळा लागण्यापूर्वी जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. बाष्पिभवनाचा वेग वाढत असून, मागच्या काही दिवसांपूर्वी ३ मि.मी. असलेला हा दर आता दुप्पट झाला असून, सोमवारी ६.२ मि.मी.पर्यंत पोहोचला आहे.वºहाडात सर्वाधिक वाईट स्थिती बुलडाणा जिल्ह्याची असून, या जिल्ह्यातील खडकपूर्णा, मस, कोराडी धरणातील जलसाठा शून्य आहे. पेनटाकळी या मोठ्या धरणात ४.५ तर तोरणा मध्यम प्रकल्पात केवळ ५.९६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. नळगंगा मोठ्या धरणात ११.९०, ज्ञानगंगा १४.६५,पलढग १९.५७, मन २०.३१ तर उतावळी या मध्यम प्रकारच्या धरणात ३२. ५९ टक्के साठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४१.७७ टक्के, एकबुर्जी ३३.०८ तर सोनल धरणात ३३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात आता केवळ २४.५५ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ५८.५३, अरुणावती ३८.५७ तर बेंबळा धरणात ३०.४५ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ४१.९१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ४२.२५ टक्के जलसाठा असून, उमा २४.१४, मोर्णा धरणात २७.५२ टक्के, तर वान धरणात ५०.१० टक्के जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणWaterपाणी