शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या केवळ २४00 शेतकर्‍यांच्या  याद्या ‘अपलोड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:58 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र  ठरलेल्या शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड ’ करण्याचे काम सुरू आहे;  कर्जमाफीस पात्र १ लाख  ९१ हजार १८७ शेतकर्‍यांपैकी केवळ २ हजार ४00 शे तकर्‍यांच्या याद्या (२४ फाइल)शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड’ झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा  लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड ’ करण्याचे काम सुरू लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र  ठरलेल्या शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड ’ करण्याचे काम सुरू आहे;  कर्जमाफीस पात्र १ लाख  ९१ हजार १८७ शेतकर्‍यांपैकी केवळ २ हजार ४00 शे तकर्‍यांच्या याद्या (२४ फाइल)शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अ पलोड’ झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा  लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  एकूण १ लाख १२ हजार ४0६ खातेदार शेतकर्‍यांच्या याद्यांच्या  ‘फाइल’ शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात येत आहे त. एका ‘फाइल’मध्ये सरासरी १00 शेतकर्‍यांच्या नावांची यादी  ‘अपलोड’ केली जात आहे. त्यामध्ये ३0 ऑक्टोबरपर्यंत शे तकरी याद्यांच्या एकूण ४१२ ‘फाइल’ अपलोड करण्यात  आल्या असून, त्यापैकी केवळ २४ फाइल (२ हजार ४00 शे तकर्‍यांच्या याद्या ) शासनाच्या ‘पोर्टल’वर यशस्वीरीत्या ‘अ पलोड’ झाल्या. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील उर्वरित  शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या ‘पोर्टल’ वर ‘अपलोड ’ होणे अद्याप  बाकी आहेत. त्यामुळे  जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार तरी केव्हा,  याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

४१२ पैकी २४ ‘फाइल’ अपलोड!३0 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  कर्जमाफीस पात्र शेतकरी याद्यांच्या  ४१२ ‘फाइल’ पोर्टलवर  ‘अपलोड’ करण्यात आल्या. त्यापैकी प्रत्यक्ष २४ ‘फाइल’  पोर्टलवर यशस्वीरीत्या ‘अपलोड’ झाल्या. उर्वरित ३७0  ‘फाइल’ पोर्टलवर अंशत: अपलोड झाल्याने, या फाइल पुन्हा  ‘अपलोड’ करण्यात येणार आहेत.

‘सर्व्हर’वर ‘लोड’मुळे ‘अपलोड’मध्ये अडथळा!राज्यभरातल्या सर्वच जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शे तकर्‍यांच्या ‘ग्रीन ’ याद्या शासनाच्या ‘आपले सरकार पोर्टल’वर  ‘अपलोड ’ करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पोर्टलच्या  ‘सर्व्हर’वर अतिभार (हेवी लोड ) येत असल्याने, शेतकरी  याद्यांच्या ‘फाईल’ पोर्टलवर अपलोड करताना वारंवार व्यत्यय  (एरर) येत आहे. त्यामुळे कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या याद्या  ‘पोर्टल’वर अपलोड करण्यात अडथळा निर्माण होत आहे.

कर्जमाफीस पात्र जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन ’ याद्यांच्या  ‘फाइल’  शासनाच्या ‘पोर्टल’वर अपलोड करण्याची प्रक्रिया  सुरू आहे. आतापर्यंत २४ ‘फाइल’ यशस्वीरीत्या पोर्टलवर ‘अ पलोड’ करण्यात आल्या आहेत.- जी.जी.मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :Farmerशेतकरी