शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बदल्या; शिक्षकांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:49 IST

अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

ठळक मुद्देआॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यासाठी तक्रारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवण्यात आल्या.मात्र, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला नाही.

- सदानंद सिरसाटअकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यावर वेळापत्रक ठरवून देत १९ ते २१ जुलैदरम्यान सुनावणीचा स्वतंत्र कार्यक्रमच आयुक्तांनी लावला. त्यासाठी पाचही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांना हजर राहण्याचे बजावले आहे.आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. दाखल तक्रारीनुसार त्यावर आयुक्त निर्णय देणार आहेत. त्यासाठी तक्रारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवण्यात आल्या. मात्र, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला नाही. त्यामुळे तक्रारी तशाच प्रलंबित आहेत. अमरावती विभागातील सर्व तक्रारींचा एकाचवेळी निपटारा करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बुधवार, १८ जुलै रोजी पत्र देत अहवाल मागवला. सोबतच तक्रारींची सुनावणी करण्यासाठी जिल्ह्यातील तक्रारकर्त्या शिक्षकांना उपस्थित राहण्याचा निरोप देण्याचेही बजावले.अकोला जिल्ह्यातील १५० पेक्षाही अधिक शिक्षकांनी बदलीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. विभागीय आयुक्त त्या शिक्षकांची तीन दिवस विभागून सुनावणी घेणार आहेत. महसूल उपायुक्तांच्या कक्षात ही सुनावणी होत आहे. १९, २०, २१ जुलै रोजी तक्रारकर्त्या शिक्षकांचे ठरावीक संख्येत म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.  शिस्तभंगाची कारवाईसुनावणी प्रक्रियेत शिक्षकांसह जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.  न्यायालयात दाखल करणार प्रतिज्ञापत्रशासनाने केलेल्या आॅनलाइन बदली प्रक्रियेतून अन्याय झाल्याच्या याचिका राज्यातील उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या प्रकरणांची सुनावणीही न्यायालयात एकत्रितपणे होत आहे. शिक्षकांच्या तक्रारीनुसार म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. त्यासाठी ही सुनावणी घेतली जात आहे.अकोट तालुक्यातील ३२ शिक्षकांच्या तक्रारीअकोला जिल्ह्यात १५० पेक्षाही अधिक शिक्षकांमध्ये अकोटमधील ३२ शिक्षकांनी एकत्रित तक्रार केली आहे. सविता तुकाराम ढाले अधिक ३२ अन्यायग्रस्त शिक्षकांची नावे त्यामध्ये आहेत, तर इतरांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक