शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम कृषी संजिवणी समितीच्या सदस्यांना ‘आॅनलाईन’ प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:06 IST

वाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात सहभागी ८१ गावातील समिती सदस्यांना मुंबई येथून तज्ज्ञ चमूने ‘आॅनलाईन’ पद्धतीने ७ फेब्रुवारीला ‘लाईव्ह’ प्रशिक्षण दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दुसºया टप्प्यात सहभागी ८१ गावातील समिती सदस्यांना मुंबई येथून तज्ज्ञ चमूने ‘आॅनलाईन’ पद्धतीने ७ फेब्रुवारीला ‘लाईव्ह’ प्रशिक्षण दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा राज्यातील १५ जिल्हयांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २९ आणि दुसºया टप्प्यात ८१ गावांची निवड करण्यात आलेली आहे. दुसºया टप्प्यात निवडण्यात आलेल्या गावांतील ग्राम कृषी संजिवनी  समितीच्या सदस्यांना प्रकल्पाची तोंडओळख व्हावी, समितीचे कर्तव्य व जबाबदाºयांची माहिती व्हावी यासाठी महाराष्टÑातील सर्व समित्यांसाठी एकाच दिवशी लाईव्ह आॅनलाईन प्रशिक्षण प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईच्यावतीने देण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १८ ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात आले. वाशिम तालुक्यातील साखरा, खरोळा, गोंडगाव, चिखली खु., मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, जउळका, रिसोड तालुक्यातील एकलासपूर, रिसोड, मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी, गिंभा, मानोरा तालुक्यातील दापूरा, मानोरा तीन सभागृह, कारंजा  तालुक्यातील कामरगाव, कारंजातील ३ सभागृहात असे एकूण १८ ठिकाणी हे प्रशिक्षण झाले.कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती सदस्यांना प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. प्रकल्पाची पार्श्वभुमी व उद्देश तसेच समिती सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे व पुढील कामाची दिशा प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासाचंद्र रस्तोगी यांनी माहिती दिली. प्रकल्प विशेष कृषी व्यवसाय रफीक नाईकवाडी यांनी ग्राम कृषी संजीवनी समितीची रचना व जबाबदाºया व अनुषंगिक माहिती दिली. कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, कृषी अभियंता गणेश मांढरे,  वित्त विशेषतज्ञ तुळशिदास सोळंके  आदींनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईच्या कविता  तागडे यांनी केले. सदरील प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रकल्प कक्षाचे मिलींद अरगडे, विवेक मानकर, प्रमोद बोबडे, राजेश कोकाटे, अनिल कंकाळ यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिम