शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

तुरीची आॅनलाइन नोंदणी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 6:12 PM

अकोला: तुरीची खरेदी करण्यासाठी यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; परंतु बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असल्याने शासनाने प्रथम आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे,

अकोला: तुरीची खरेदी करण्यासाठी यावर्षी महाराष्टÑ स्टेट को-आॅप फेडरेशनच्यावतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत; परंतु बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असल्याने शासनाने प्रथम आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही लूट होण्याची शक्यता शेतकºयांनी व्यक्त केली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी १०० क्ंिवटल तुरीची आवक झाली.तुरीला यावर्षी ५,६७५ रू पये हमी दर जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी तुरीचे उत्पादन बºयापैकी होण्याची शक्यता आहे. काही भागातून नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे.परंतु तुरीचे केंद्र सुरू करण्याचे प्र्रस्ताव सहकारी संस्थाकडून मागविण्यात आले आहेत.ही केंद्र सुरू होईपर्यंत तरी शेतकºयांना बाजारात तूर विकावी लागत आहे. बाजारात हमीपेक्षाही कमी दराने बाजारात ही तूर खरेदी केली जात असल्याने शासनाने आॅनलाइन नोंदणी करण्याची गरज आहे.मागीलवर्षी तुरीचे हमीदर व बोनस मिळून शेतकºयांना प्रतिक्विंटल ५०५० रुपये मिळाले पण तुर खरेदीला प्रंचड विलंब झाला, प्रतवारीचे निकषही लावण्यात आले तसेच आॅनलाइन नोंदणीसाठी शेतकºयांची चांगलीच धावपळ झाली.यावर्षी शेतकºयांना अशा परिस्थितीचा सामना आतापासूनच करावा लागत आहे. बाजारात सद्या नवीन तुरीला प्रतिक्ंिवटल ४,८०० ते ५ हजार रू पये दर मिळत आहेत असे असले तरी हे दर हमीदरापेक्षा ६०० ते ८०० रू पयाने कमी आहेत. पण व्यापारी सध्या निकष न लावता तुरीची थेट खेरदी करीत असल्याने शेतकºयांना दिलासादायक ठरत आहे. फेडरेशन एफएक्यू प्रतीच्या तुरीला हे दर देणार आहे. त्यामध्ये तुरीच्या आर्द्रतेची अट आहे. शिवाय ज्या सहकारी संस्थाना खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीच्या अटी टाकण्यात आल्या आहेत. असे असले तरी शेतकरी शासकीय तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी तूर विक्रीची रोकड थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी ३३८ क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यात आली तसेच नवीन तूर जवळपास १०० क्ंिवटल खरेदी करण्यात आली. शेतकरी आर्थिक अडचनीत असल्याने त्यानांही तूर विकण्यावाचून पर्याय नसल्याने येत्या आठवड्यात तुरीची आवक वाढणार असल्याने व्यापारी तूर खरेदी करण्यास सज्ज आहे.

-बाजारात तुरीची आवक सुरू झाल्याने शासनाने तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे. अगोदर आॅनलाइन नोंदणी सुरू करावी,म्हणजे शेतकºयांची धावपळ होणार नाही.मनोज तायडे,संयोजक,शेतकरी जागर मंच,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती