शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन’ नसलेल्या डोंगरगावच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे 'ऑनलाइन’ धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:04 IST

गावातीलच एका खोलीत ई-लर्निंग टीव्ही संचाद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याची व्यवस्था अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलच्यावतीने करण्यात आली आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमिवर डोंगरगाव येथील गरीब कुटुंबातील ‘स्मार्टफोन ’ नसलेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्टया दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परीक्षेचे ‘आॅनलाइन’ धडे देण्यात येत आहेत. गावातीलच एका खोलीत ई-लर्निंग टीव्ही संचाद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याची व्यवस्था अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलच्यावतीने करण्यात आली आहे.न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेले डोंगरगाव येथील सहा विद्यार्थी यावर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची तयारी करीत आहेत. गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन ’ नसल्याच्या परिस्थितीत गरीब व हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे ‘लॉकडाऊन’ होऊ नये, यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूलच्यावतीने तंत्रस्रेही शिक्षक शशिकांत बांगर यांनी ई-लर्निंग टीव्ही संच तयार केला. डोंगरगाव येथील सुभाष काकडे यांच्या सहकार्याने गावातीलच एका खोलीत ई-लर्निंग टीव्ही संच लावून, त्याद्वारे स्मार्टफोन नसलेल्या गावातील सहा विद्यार्थ्यांना २६ जूनपासून शिष्यवृत्ती परीक्षेचे आॅनलाइन धडे देण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांना गावातच आॅनलाइन शिक्षण घेण्याची व्यवस्था उपलब्ध झाली. शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांना १४ जुलैपासून ई-लर्निंंग टीव्ही संचाद्वारे नियमित शिक्षणाचे धडेदेखिल देण्यात येत आहेत.

डोंगरगाव येथील गरीब कुटुंबातील स्मार्टफोन नसलेल्या सहा विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परीक्षा देणाºया इयत्ता आठवीतील सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृती परीक्षासह नियमित शिक्षणाचे आॅनलाइन धडे देण्यासाठी न्यू इंग्लिश हास्कूलच्याववतीने गावातच ई-लर्निंग टीव्ही संच लावण्यात आला आहे. त्याद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.-माधव मुन्शीप्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी