शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘बिझनेस लोन’च्या नावाखाली विद्यार्थिनीची आॅनलाइन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 14:00 IST

बँक फायनान्स संदर्भात वेगवेगळे कारण देत ७८ हजार ५०० रुपये काजोलकडून उकळण्यात आले.

अकोला : आदर्श कॉलनी येथील रहिवासी एका विद्यार्थिनीची ‘बिझनेस लोन’च्या नावाखाली ७८ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्राप्त माहितीनुसार, आदर्श कॉलनी येथील रहिवासी युवती काजोल ही बी. कॉम.ची विद्यार्थिनी असून, तिने बिझनेस लोन मिळेल का, म्हणून तिच्या मोबाइलवर आॅनलाइन शोध घेतला. तेव्हा तिला ‘क्विक अ‍ॅड इझी फायनान्स’ नावाची लिंक प्राप्त झाली. ही लिंक ओपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ जून रोजी तिला दिव्या नामक महिलेचा फोन आला. तुम्ही आमच्या लिंकला भेट दिली म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, असे म्हणाली. त्यानंतर दिव्या नामक महिलेने काजोलच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर एक केवायसी अर्ज पाठविला. सोबतच तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल, असा मॅसेजदेखील दिला. हा केवायसी अर्ज भरून काजोलने पुन्हा त्याच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठविला व मागणीनुसार आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व फोटो पाठविले. अर्जाचे शुल्क म्हणून तिने दिलेल्या फिनो बँक खात्यामध्ये २४ जून रोजी तीन हजार रुपये जमा केले. त्यानंतर दिव्याने सांगितल्यानुसार, काजोलला तिच्या साहेबांचा व्हेरीफिकेशनसाठी फोन आला. एक लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे त्याने सांगितले; मात्र लोनची ट्रान्सफर फी म्हणून २१ हजार रुपये भरावी लागेल. लोनसोबत ती रक्कम परत येईल, असा विश्वास दिला. यावर विश्वास बसल्याने काजोलने फिनो बँकच्या त्याच खात्यावर २१ हजार रुपये पुन्हा भरले. त्यानंतर त्याच रेफरन्सने बँक फायनान्स संदर्भात वेगवेगळे कारण देत ७८ हजार ५०० रुपये काजोलकडून उकळण्यात आले. त्यानंतरही पुन्हा ‘एनओसी’साठी २६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यावरून काजोलने पोलिसांत तक्रार दिली.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी