शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’च्या ७३१ राखीव जागांसाठी पुन्हा आॅनलाइन अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:13 IST

प्राथमिक शिक्षण विभागाने उर्वरित ७३१ राखीव जागांवरील प्रवेशासाठी पुन्हा पालकांकडून आॅनलाइन अर्ज मागविले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २०८ नोंदणी झालेल्या इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव २४८२ जागांसाठी सोडत घेण्यात आली. पहिल्या व दुसºया सोडतीमध्ये विद्यार्थ्यांना २३७६ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या. उर्वरित ७३१ राखीव जागांवरील प्रवेशासाठी पुन्हा पालकांकडून आॅनलाइन अर्ज मागविले आहेत.

अकोला : ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर आतापर्यंत १७६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही शाळा भाडेकरारनामाचा विषय, विविध प्रकारचे शुल्क सांगून इंग्रजी शाळा प्रवेश टाळण्याचे प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात पालकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने उर्वरित ७३१ राखीव जागांवरील प्रवेशासाठी पुन्हा पालकांकडून आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. त्यासाठी २६ मे ते ४ जूनपर्यंत अर्ज करण्यास सवलत दिली आहे. पुन्हा अर्ज केलेल्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.अकोला  जिल्ह्यातील २०८ नोंदणी झालेल्या इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव २४८२ जागांसाठी सोडत घेण्यात आली. पहिल्या व दुसºया सोडतीमध्ये विद्यार्थ्यांना २३७६ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या. या जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी वेगवेगळी कारणे पुढे करून विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. तसेच भाडेकरारनामा याचीसुद्धा प्रवेशासाठी आडकाठी येत असल्याने पालक त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी पुणे शिक्षक आयुक्त, शिक्षण संचालक कार्यालयाकडे शाळा प्रवेशासंबंधीच्या तक्रारी केल्या. तसेच अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिळणाºया शुल्क प्रतिपूर्ती अनुदानासाठी न्यायालयात गेल्या आहेत. शासनाने शुल्क प्रतिपूर्ती केल्याशिवाय आम्ही २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नसल्याची भूमिका इंग्रजी शाळांनी घेतल्यामुळे पालक चिंतेत पडले आहेत. पालकांनी, त्यांच्या पाल्यांची इंग्रजी शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता यावी आणि उर्वरित ७३१ राखीव जागांसाठी पुन्हा पालकांकडून आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. तसेच आता खुला प्रवर्ग सोडून विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी, एसबीसी संवर्गातील बालकांच्या पाल्यांसह एचआयव्ही बाधित बालकांच्या पाल्यांना उत्पन्नाच्या मर्यादेची अट लागू राहणार नाही; परंतु त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिक