शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

विनयभंग प्रकरणातील आराेपीस एक वर्षांचा कारावास

By सचिन राऊत | Updated: September 25, 2023 19:46 IST

यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. 

अकाेला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रहिवासी असलेल्या विवाहितेला अश्लील बोलून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने साेमवारी एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. 

बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आरोपी संतोष जानराव तळाेकार वय २५ वर्ष याने गावातीलच रहिवासी असलेली एक विवाहित महिला तिच्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असताना आरोपीने महिलेचा हात पकडत अश्लील वर्तन केले. महिलेने विरोध केला असता त्याने धमकी दिली. या प्रकरणी महिलेने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष जानराव तळाेकार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एन एस काळे यांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. 

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने चार साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीविरुद्ध आढळलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे त्याला कलम ३५४ अन्वये एक वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ऍड आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून श्रीकृष्ण पाचपाेर यांनी त्यांना सहकार्य केले. 

टॅग्स :jailतुरुंगMolestationविनयभंगCourtन्यायालय