शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

दारूची अवैधरित्या विक्री करणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:12 IST

सदाशिव श्रीराम जाधव (वय ३०)याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी (एमपीडीए) अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली.

अकोला : अवैध गावठी दारू तयार करणे, ती विकणे व तिची वाहतूक करणे, पोलिसांनी कारवाई करूनही त्याच्यावर कोणताही परिणाम न होणे  व गुन्हेगारी पृष्ठभूमी असणे, अशा गंभीर प्रकरणाची दखल घेत बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजळी येथील सदाशिव श्रीराम जाधव (वय ३०) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी (एमपीडीए) अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर सदाशिव श्रीराम जाधव याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सदाशिव श्रीराम जाधव याचेवर यापूर्वी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, दारूची वाहतुक करणे तसेच अवैद्य गावठी दारू विक्री करणे असे बरेच गुन्हे दाखल आहेत. विवीध कलमान्वये त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याचेवर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता.  जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत हातभट्टीवाला असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश १८ सप्टेंबर रोजी पारीत केला. त्यानंतर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशावरून सदाशिव श्रीराम जाधव याचा तात्काळ शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले व  जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, नापोशि. मंगेश महल्ले यांनी तसेच बार्शिटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तिरूपती राणे, तसेच नापोकॉ प्रतापसिंग राठोड, पोकॉ. किशोर, पोकॉ. गोपाल लाखे यांनी केली.