शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

महाराष्ट्रातून  दररोज गुजरातला चालला एक हजार ट्रक कापूस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 18:57 IST

- राजरत्न शिरसाटअकोला: राज्यातील कापूस हमीदराने खरेदी केला जात नसून, बोनसची शक्यता नसल्याने येथील शेतकºयांवर शेजारच्या गुजरात राज्यात कापूस विकण्याची पाळी आली आहे. गुजरातमध्ये बºयापैकी दर असल्याने येथून दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला जात आहे. त्याचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर (वस्तू व सेवा कर)होत असल्याचे तज्ज्ञांचे मत ...

ठळक मुद्देबोनसचा लाभ घेण्यासाठी व्यापाºयांची धडपड राज्यातील जीसटीवर परिणाम

- राजरत्न शिरसाटअकोला: राज्यातील कापूस हमीदराने खरेदी केला जात नसून, बोनसची शक्यता नसल्याने येथील शेतकºयांवर शेजारच्या गुजरात राज्यात कापूस विकण्याची पाळी आली आहे. गुजरातमध्ये बºयापैकी दर असल्याने येथून दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला जात आहे. त्याचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर (वस्तू व सेवा कर)होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर गुजरात सरकारने प्रतिक्ंिवटल ५०० रू पये बोनस जाहीर करू न तेथील कापूस उत्पादक शेतकºयांना खूष करण्याचा प्रयत्न केला.म्हणजचे हमीदर प्रतिक्ंिवटल ४,३२० आणि बोनस ५०० रू पये असा ४,८२० रू पये शेतकºयांना मिळत आहेत.येथील कापसाचे दर अद्यापही ३,८५० ते ४,२०० रू पये प्रतिक्ंिवटल असून, प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने कापसाचे दर ४ हजाराच्या आतच आहेत.गुजरातमध्ये प्रतिक्ंिवटल ४,२०० रू पयाच्यांवर कापसाचे दर मिळत असल्याने येथील शेतकºयांनी गुजरातमध्ये कापूस पाठविण्याचा धडाका सुरू केला आहे. मराठवाडा,खान्देश, विदर्भातून हा कापूस गुजरातमध्ये पाठवला जात असून, अनेक ठिकाणी याकामासाठी गुजरातच्या व्यापºयांनी या कामासाठी एजंट नेमले आहेत.यावर्षी कापूस पीक जोरदार असून,मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात महाराष्टÑातील कापसाची आवक दररोज २ लाख २५ हजार क्ंिवटलपर्यंत एवढी वाढली . पण दर नसल्याने उत्पादन खर्चही कठीण असल्याने शेतकरी गुजरातला कापूस पाठवत आहे. गुजरातला येथून दरवर्षी कापूस जातच असतो पण यावर्षीचे प्रमाण हे दरवर्षीपेक्षा जास्त म्हणजे दररोज एक हजार ट्रक आहे.एका ट्रकमध्ये जवळपास शंभर क्ंिवटल कापूस असतो हे विशेष.याचा फटका राज्याच्या वस्तू व सेवा करावर होत आहे.

राज्यातील शेतकºयांना बोनसची प्रतीक्षाराज्यात यावर्षी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे पण शासकीय कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारी, ओलाव्याचे निकष लावले जात असल्याने शेतकºयांना त्याचा कापूस व्यावाºयांनाच विकावा लगात आहे. व्यापाºयांकडून हमीपेक्षा कमी दराने कापसाची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांनी गुजरातला कापूूस पाठवणे सुरू केले आहे.अनेक शेतकºयांनी बोनसच्या प्रतीक्षेत कापूस राखून ठेवला आहे.

- गुजरातला कापसाचे दर बºयापैकी असल्याने येथील शेतकरी दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातला पाठवत आहे. तेथील व्यापाºयांना बोनसचा लाभ होणार असल्याने कापसाची मागणी वाढली आहे.वसंत बाछुका, कापूस उद्योजक,अकोला.

टॅग्स :cottonकापूस