पिके कोमेजण्याच्या मार्गावर
अकोट : यंदा खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बहुतांश पेरणी रखडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांची पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
इंधन दरवाढीने नागरिक हैराण
पातूर : पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा मोठा परिणाम झाला असून ऑॅटोचालक, मालवाहू वाहनधारक यासह इतरही नागरिक हैराण झाले आहेत.
शाैचालय वापराकडे लाभार्थींचे दुर्लक्ष
बाळापूर : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली; मात्र अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच होत नाही. बहुतांश नागरिक आजही उघड्यावरच शाैचास जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील गाव परिसरातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे विशेषत: धुवाधार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनांचा अभाव
बार्शीटाकळी : गावातील विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासह सॅनिटायझरची व्यवस्थाही राहत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
पारस : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची आजमितीस मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.