मूर्तिजापूर : तालुक्यातील भगोरा गावा नजीक शिवारात असलेल्या गिट्टी खदान मध्ये ट्रॅक्टर कोसळून एक जण ठार झाल्याची घटना १६ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. संदीप अर्जुन तायडे (३५) राहणार जामठी खुर्द असे मृतकाचे नाव आहे. मृतक संदीप अर्जुन तायडे हा भगोरा येथील असलेल्या गिट्टीखदान मध्ये ब्लॉस्टींगने दगड काढण्यासाठी ट्रॅक्टर (ब्लॉस्टींग) वरुन खाली खदान मध्ये उतरवित असताना ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने अचानक खोल असलेल्या खदानीत जावून कोसळल्याने डोक्याला जोरदार दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संदीप हा मजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती आहे. सुमेद दामोदर राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
गिट्टी खदानमध्ये ट्रॅक्टर कोसळून एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 19:48 IST
Accident News ट्रॅक्टर कोसळून एक जण ठार झाल्याची घटना १६ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
गिट्टी खदानमध्ये ट्रॅक्टर कोसळून एक जण ठार
ठळक मुद्देसंदीप अर्जुन तायडे (३५) राहणार जामठी खुर्द असे मृतकाचे नाव आहे. संदीप हा मजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती आहे.