दिवसभरात एकाचा मृत्यू; ३१ पॉझिटिव्ह, ६४ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:09 PM2020-08-18T18:09:48+5:302020-08-18T18:09:58+5:30

दिवसभरात ३१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२९० झाली आहे.

One death during the day; 31 positive, 64 corona free |  दिवसभरात एकाचा मृत्यू; ३१ पॉझिटिव्ह, ६४ जण कोरोनामुक्त

 दिवसभरात एकाचा मृत्यू; ३१ पॉझिटिव्ह, ६४ जण कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, १८ आॅगस्ट रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या आजाराच्या बळींची एकूण संख्या १३७ वर गेली आहे. तर दिवसभरात ३१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२९० झाली आहे. दरम्यान, ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २१५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३१ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १३ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील सहा जणांसह, दहिगाव गावंडे येथील चार, अकोला शहरातील गड्डम प्लॉट येथील दोन, सिद्धार्थ नगर जूने शहर, कृषी नगर, अष्टविनायक नगर व तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील सहा जणांसह रिधोरा बाळापूर येथील तीन, मोठी उमरी, मळसूर, जूने शहर, रामदास पेठ, शास्त्री नगर व जठारपेठ चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
जुने शहरातील सिद्धार्थनगर भागातील ७४ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

६४ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटर येथून ३१, ओझोन हॉस्पीटल येथून सहाा, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर, बाशीर्टाकळी येथून आठ, कोविड केअर सेंटर अकोट येथून सात अशा एकूण ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

३९४ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २७५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: One death during the day; 31 positive, 64 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.