शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 14:13 IST

अकोला: दिल्ली येथून एका ट्रकमध्ये भरू न आणलेल्या ५० लाख रू पयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल अकोला पोलिसांनी शनिवार, १६ जून रोजी अकोला पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्देगुटख्याचा मोठा साठा थेट दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे अकोल्यात आला . अनेक दिवसांपासून या ट्रकवर पाळत ठेवून असलेल्या विशेष पथकाला हा ट्रक शनिवारी दुपारी घुसरमार्गे येत असल्याचे कळताच पथकाने या परिसरात पाळत ठेवली.विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे यांनी सुमारे ५० लाख रुपयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोला: दिल्ली येथून एका ट्रकमध्ये भरू न आणलेल्या ५० लाख रू पयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल अकोला पोलिसांनी शनिवार, १६ जून रोजी अकोला पोलिसांनी जप्त केला.महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा मोठा साठा थेट दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे अकोल्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुसर गावानजीक गुटख्याचा मोठा ट्रक पकडून गुटखा जप्तीची कारवाई केली.राज्य शासनाने विविध प्रकाराच्या तंबाखूमिश्रित गुटख्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर शहरासह जिल्ह्यात तंबाखूमिश्रित गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे अळसपुरे यांनी केलेल्या कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दिल्लीवरून एच. आर. ३८-०९४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये सुमारे ५० लाखांचा गुटखा अकोल्यात येत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली. गत अनेक दिवसांपासून या ट्रकवर पाळत ठेवून असलेल्या विशेष पथकाला हा ट्रक शनिवारी दुपारी घुसरमार्गे येत असल्याचे कळताच पथकाने या परिसरात पाळत ठेवली. दर्यापूर मार्गे येत असलेला हा गुटख्याचा साठा अकोट फैलातील एका ट्रान्सपोर्टवर उतरविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली होती. मात्र त्यापुर्वीच विशेष पथकाचे प्रमुख अळसपुरे यांनी सुमारे ५० लाख रुपयांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील रावर हरपालसिंग राजपूत (६५) रा. जिंग्रा कॉलनी ता.जि. शिवरी मध्य प्रदेश, सोपरन रामवर राजपूत (२२) रा. जिंग्रा कॉलनी ता. जि. शिवरी मध्य प्रदेश, वहिद खान जागीर खान (४८) रा. बैदपुरा व श्यामसुंदर कृपाशंकर पांडे (४०) जय रिटेल लॉजिस्टिकचा डीलर रा. कैलास टेकडी सिंधी कॅम्प या चौघांना अटक करण्यात आली आहे. सदर गुटख्याचा साठा आता अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी व त्यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस