शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

 ६४ घरांच्या पटावर दिव्यचक्षू ओमकारची डोळस कामगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 7:02 PM

दिव्यचक्षूंच्या अडचणी, आव्हाने आणि त्यावर मात करण्याची जिद्द ओमकारमध्ये ठासून भरलेली दिसत होती.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: डोळस खेळाडू जितक्या सफाईने डाव मांडत नसतील, त्यापेक्षा अधिक अचूकपणे ६४ घरांच्या पटावरील खेळ दिव्यचक्षू असलेला ओमकार तळवळकर खेळत होता. ओमकार खेळत असताना पाहताना वरवर हे सर्व सोपे असल्याचे दिसत होते; मात्र त्यासोबतच दिव्यचक्षूंच्या अडचणी, आव्हाने आणि त्यावर मात करण्याची जिद्द ओमकारमध्ये ठासून भरलेली दिसत होती.अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेनिमित्त ओमकार अकोल्यात आला आहे. ओमकार हा अवघ्या ११ वर्षांचा आहे. ओमकार जन्मत:च दृष्टिहीन आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रात ओमकारला बालपणापासूनच आवड आहे. जलतरण आणि बुद्धिबळ खेळात तरबेज आहे. तबला आणि पखवाज वाजविण्याचा त्याला छंद आहे. तसेच शालेय स्पर्धात्मक परीक्षादेखील त्याने उत्तीर्ण केलेल्या आहेत. ओमकार हे सर्व त्याचे वडील समीर तळवळकर यांच्या प्रोत्साहन आणि पाठबळामुळे सहज करीत आहे. वडील समीर हेच ओमकारचे डोळे आहेत. ओमकार सध्या पुणे येथील महर्षी कर्वे शिक्षण शिशू विहार येथे इयत्ता सहावीत शिकत आहे. त्याने १५ आणि ११ वर्षे वयोगटात याआधी खेळप्रदर्शन केले आहे. खुल्या गटात या स्पर्धेनिमित्त पहिल्यांदाच खेळत आहे. ओमकार ‘एआयसीएफबी’च्या स्पर्धा खेळतो. आळंदी येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या दृष्टिहिनांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ओमकारची निवड झालेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी व्हावी, यासाठी नियमित कसून सराव करीत असल्याचे ओमकारने सांगितले.ओमकारला बुद्धिबळाचे प्राथमिक प्रशिक्षण त्याचे वडील समीर यांनी दिले. सध्या पुणे येथेच माधवी जोगळेकर यांच्या मार्गदर्शनात तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. ओमकारने आतापर्यंत बुद्धिबळावरील दोन पुस्तके वाचली आहेत. डाव खेळताना बेल नोट टेकरवर स्वत: खेळाची नोंद करतो. साधारणत: वयाच्या २१ व्या वर्षी दृष्टिहीन व्यक्ती कोणत्याही विषयात किंवा सामान्य जगण्यासाठी परिपक्व होतो; मात्र ओमकार वयाच्या अकराव्या वर्षीच परिपक्व झाला असून, सामान्य मुलांप्रमाणे प्रत्येक गोष्टीतील बारकावे सहज टिपतो. सामान्य खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसारच दृष्टिहीन बुद्धिबळपटूंना खेळावे लागते. ओमकारने जिल्हा पातळीवर सामान्य मुलांना पराभूत करू न दृष्टिहीन कुठेच कमी नाहीत, हे सिद्ध करू न दाखविले आहे. दृष्टिहीन खेळाडूही ६४ घरांचा शक्तिशाली राजा बनू शकतो, हे ओमकारने दाखवून दिले. ओमकारची बुद्धिबळातील वाटचाल आशावर्धक आहे. डोळस बुद्धिबळपटूंनाही ओमकार तगडे आव्हान देत आहे, एवढे मात्र निश्चित. 

 

टॅग्स :AkolaअकोलाChessबुद्धीबळ