रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तोडफोड करून ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 07:28 PM2020-11-10T19:28:51+5:302020-11-10T19:38:51+5:30

Murtijapur News जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके व पंचायत समिती सदस्य नकुल पाटील काटे, देवाशीष भटकर यांनी  कार्यालयाला टाळे ठोकले.

The office of the Employment Guarantee Scheme was locked | रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तोडफोड करून ठोकले टाळे

रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तोडफोड करून ठोकले टाळे

Next

- संजय उमक
मूर्तिजापूर :  पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात नेहमी कोणीच उपस्थित राहत नसल्याने नागरीकांची कामे होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके व पंचायत समिती सदस्य नकुल पाटील काटे, देवाशीष भटकर यांनी  कार्यालयाला १० नोव्हेंबर रोजी ३ वाजता टाळे ठोकले.
                     मंगळवारी अनेक नागरीक कार्यालयात कामानिमित्त कार्यालयाच्या बाहेर कर्मचाऱ्यांची वाट पहात उभे असतांना ही बाब उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके, पंचायत समिती सदस्य नकुल पाटील काटे व देवाशीष भटकर यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी कर्मचाऱ्यांची शोधाशोध केली पण कुठलाही कर्मचारी दिसून आला नाही. या कार्यालयांतर्गत अनेक गैर प्रकार चालत असल्याची माहिती आहे.
या गैर प्रकाराला आळा घालण्यासाठी तीनही स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाला कुलूप ठोकले दरम्यान सोमवारी पोही येथील सरपंचाने केलेल्या आत्मदहन प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मायाताई नाईक यांचे पती संजय नाईक यांनी पंचायत विभागाची व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कार्यालयाल्याची कुलूप तोडून टेबल खुर्च्यांची व संगणकाची तोडफोड केली. कार्यालयीन कामकाजाची वेळ सव्वा सहा वाजताची असताना साडेपाच वाजताच सहा कर्मचारी वगळता संपूर्ण कार्यालय रिकामे आढळून आल्याने संताप अनावर झाल्याने संजय नाईक यांनी कार्यालयात तोडफोड केली व गटविकास अधिकारी येईपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा हट्ट त्यांनी केला. परंतु उपस्थितांनी त्यांची समजूत घालुन प्रकरणावर पडदा टाकला असला तरी कामकाज सुरळीत होत नाही व अधिकारी वेळेत उपस्थित राहणार नाही तोपर्यंत आपण अशीच तोडफोड करत राहणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले
 
कार्यालयाची जागा अपुरी असल्याने मी व्यक्तिगत पंचायत समिती कार्यालयात तळमजल्यावरील कार्यालयात बसून संपूर्ण कार्यालयीन कामकाज पहातो.  कार्यालयात दोन अॉपरेटर सह आणखी कर्मचारी उपस्थित असतात ऐनवेळेळी सुटी मागुन ते लोक बाहेर गेल्याने सदर प्रकार घडला. टोळे लावतेवेळी मी संबंधित सदस्यांना भेटलो पण त्यांनी ताळा लावण्याचा कार्यक्रम पुर्ण केला. 
- उमेश निखाडे
सहायक कार्यक्रम अधिकारी, म. गांधी रो. ह. यो पंचायत समिती मूर्तिजापूर

Web Title: The office of the Employment Guarantee Scheme was locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.