शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अडगाव बु. येथे दोन गटात हाणामारी

By admin | Updated: March 15, 2017 02:45 IST

एक गंभीर ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हिवरखेड (अकोला), दि. १४- हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अडगाव बु. येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.अडगाव येथील संजय रामदास राजनकर (२५) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, गावातीलच श्याम कोल्हे, शुभम नांदुरकर व श्रीकांत सुलताने या तिघांनी संगनमत करून कोणतेही कारण नसताना धुळवडीच्या दिवशी दुपारी ३ वाजता दरम्यान माझा पुतण्या प्रफुल्ल अशोक राजनकर (२१) याला लोखंडी पाइपने मारहाण केली. प्रफुल्ल राजनकर हा गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध भादंवि ३२४, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले, तर याचप्रकरणी दुसर्‍या गटाने श्रीकांत लक्ष्मण सुलताने (२४) रा. देवीपुरा अडगाव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, श्याम कोल्हे हे त्यांच्या हार्डवेअर दुकानात हजर असताना अडगावातीलच पंकज देशमुख, प्रवीण राजनकर, श्याम नाठे, प्रफुल्ल राजनकर यांनी हार्डवेअरच्या दुकानात घुसून लोखंडी पाइपने मारहाण, नासधुस व शिवीगाळ केली. या मारहाणीत श्याम कोल्हे हे जखमी झाले असून, त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवरखेड येथे उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुद्ध भादंवि ३२४, ५0४, ४२७, ४५२, ३३६, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले. सदर घटना सोमवार, १३ मार्च धुळवडच्या दिवशी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे अडगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हाणामारी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हवालदार जगदीश पुंडकर, राजेश भगत करीत आहेत.