शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या मालकीचे डुप्लेक्स विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 18:09 IST

पारस येथील पाच जनांविरुध्द बाळापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला - पारस येथील कृष्णविहार या नावाने असलेल्या १८ डुप्लेक्समधील कल्पना मधुकर पवार यांच्या मालकीचे ८ अ क्रमांकाच्या डुप्लेक्सचे खोटे व बनावट दस्तावेज तयार करून सदर डुप्लेक्सवर गैरकायदेशीर ताबा करून त्याची विक्री करणाºया पारस येथील पाच जनांविरुध्द बाळापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक भरत रुपारेल यांनी पारस येथे कृष्णविहार नावाने १८ डुप्लेक्स आणि १२ दुकाने बांधलेली आहेत. या १८ डुप्लेक्समधील ८ अ क्रमांकाचे खालच्या भागाचे डुप्लेक्स अकोल्यातील लहाण उमरी येथील रहिवासी कल्पना मनोहर पवार यांनी व मनोहर पवार या दाम्पत्याने १३ डिसेंबर २०१७ रोजी खरेदी केले आहे. मात्र याच ठिकाणी रहिवासी असलेले विजय बाळकृष्ण इंगोले, बाळकृष्ण गणपतराव इंगोले, मंगला बाळकृष्ण इंगोले, सदानंद विलास सदांशिव व आशीष अशोक वानखडे या पाच जनांनी कल्पना पवार यांच्या डुप्लेक्सवर बेकायदेशीररीत्या ताबा करून खोटे दस्तावेज तयार केले आणि पवार यांना खंडणी मागीतली. त्यानंतर कल्पना पवार यांच्या ८ अ डुप्लेक्सच्यावरील डुप्लेक्स हे इंगोले कुटुंबीयांच्या मालकीचे असून खालचे डुप्लेक्सही त्यांनाच देण्याची मागणी सदानंद सदाशिंव व इंगोले कुटुंबीयांनी पवार यांच्याकडे केली. यावर कल्पना पवार यांनी होकार देउन डुप्लेक्स विक्री करण्यासाठी सहमती दर्शवीली. त्यानुसार ८ अ आणि ८ ब ची इसार पावती इंगोले यांच्या नावाने करून दिली. मात्र त्यानंतर इंगोले कुटुंबीयांनी खरेदी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ८ अ या खालच्या डुप्लेक्सला कल्पना पवार यांनी कुलुपबंद करून ते अकोल्यात स्थायीक झाले. त्यावर बराच कालावधी उलटल्याने पवार दाम्पत्य सदानंद सदाशिंव यांच्याकडे ३१ जुलै रोजी गेले आणि त्यांनी इंगोले कुटुंबीय खरेदी घेणार की नाही या संदर्भात विचारणा केली. यावेळी पवार यांचे डुप्लेक्स उघडे दिसल्याने हे दाम्पत्य त्यांच्या डुप्लेक्समध्ये गेले असता या ठिकाणी इंगोले कुटुंबीय बेकायदेशीरीत्या राहत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी दस्तावेजांची तपासणी केली असता सदर डुप्लेक्सचे बनावट दस्तावेज तयार करून खोटया स्वाक्षरीव्दारे त्यावर ताबा केल्याचे उघडकीस आले. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कल्पना पवार यांनी बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर पाच जनांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०,४५२,४६८,४७१,३४नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी