शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..' ; सोशल मिडियावर गाजतोय व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 18:08 IST

Akot News : अकोट कला मंचने बनवलेला "ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..आमचा जनमित्र लय आहे ग्रेट!" या गाण्याचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे.

अकोट: ज्या ग्राहकांना वारंवार सूचना करूनही आतापर्यंत थकलेले वीज बिल  भरले नाही. त्यामुळे विज बिल वसुली जनजागृती करीता महावितरणचे कामगिरीचा फंडा चांगला गाजत आहे.  अकोट कला मंचने बनवलेला "ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..आमचा जनमित्र लय आहे ग्रेट!" या गाण्याचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे.अकोट येथील महावितरणचे कार्यालयात गांधी जयंती साजरी करीत या जनजागृती व्हिडीओचे लाईव्ह विमोचन प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज व उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महावितरणचे उपविभागीय अभियंता गोपाल अग्रवाल, सहाय्यक अभियंता अरुण जाधव, अशोकसेठ अढीया, महेंद्र सोनोने, आतंरराष्ट्रीय गिर्यारोहक धिरज कळसाईत, राजेश सांळुके, विजय बेदरकर, तसेच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात आँक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला पण विज पुरवठाची अविरत सेवा दिली. ग्राहकांचा चालु बिलसह थकबाकीदार ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केल्या जात आहे. दरम्यान खंडित केलेली विज बिल भरणा झाल्यावरही जोडणी शुल्क घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे पुन्हा जोडणी शुल्क टाळता यावे,विज बिल भरावे याकरीता सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान विज बिल वसुली बाबत ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे तसेच महावितरणची कामगिरीची माहीती विशद करीत ,विज बिल भरणा केंद्रासह इतर लाईव्ह व्हिडीओ सामाजिक जनजागृती म्हणून अकोट कला मंचने प्रस्तुत केला आहे. या व्हिडीओ मधील काल्पनिक पात्र ग्राहक सेठ व तयार केलेले गाण सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे. सामाजिक जनजागृती म्हणून  महावितरण कर्मचारी योगेश वाकोडे यांनी व्हिडीओची निर्मिती केली. तर अरुण दावले यांनी गित लिहले असुन महेंद्र सोनोने यानी गित गायिले आहे. मार्गदर्शन विजय शिंदे यांनी केले असुन सेठ ची भुमिका अशोक अढीया यांनी पार पाडली आहे. तर महावितरणचे अधिक्षक अभियता पवन कुमार कछोट, कार्यकारी अभियंता अनिल उईके, उपविभागीय अभियंता गोपाल अग्रवाल तसेच अधिकारी- कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

टॅग्स :AkolaअकोलाSocial Mediaसोशल मीडियाakotअकोटmahavitaranमहावितरण