‘एनएसयूआय’ने दिला अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:53 PM2018-07-21T15:53:30+5:302018-07-21T15:55:24+5:30

‘नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया’ (एनएसयूआय)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या देऊन मागणीचे निवेदन सादर केले.

 'NSUI' agitation in front of the Dean of GMC Akola | ‘एनएसयूआय’ने दिला अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या

‘एनएसयूआय’ने दिला अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देवसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाबाहेरील आरओ प्लांटवरून किंवा बाहेरच्या विक्रेत्यांकडून पाणी आणावे लागते.पाण्याची व्यवस्था न झाल्यामुळे ‘एनएसयूआय’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या ‘नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया’ (एनएसयूआय)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या देऊन मागणीचे निवेदन सादर केले.
वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाबाहेरील आरओ प्लांटवरून किंवा बाहेरच्या विक्रेत्यांकडून पाणी आणावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून, शैक्षणिक व आर्थिक दोन्ही नुकसान होत आहे. यासंदर्भात एनसएयूआय ने १३ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना भेडसावणाºया समस्येची माहिती त्यांना दिली होती. त्यावेळ चार ते पाच दिवसांत व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. निवेदन देऊन आठ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पाण्याची व्यवस्था न झाल्यामुळे ‘एनएसयूआय’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी अधिष्ठातांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी एनएसयूआयचे प्रदेश महासचिव आकाश कवडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील यांच्यासह सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सारवान, एनएसयूआयचे अक्षय गडेकर, सम्राट ठाकरे, ऋषीकेश जामोदे, सारंग शिंदे, सागर वानखडे, विजय जामनिक, अनिल वानखडे, सुमेध पहुळकर, विजय धुमाळ, वैभव सुडकर, अभिजीत तवर, कुणाल झांबरे, ऋषभ डोंगरे, मुकुंद सरनाइक, करण पांडे, अंकुर शर्मा, शुभम वर्मा, संतोष झांझोटे, रितेश राऊत, आशिष नागे, सोनू ढगे, आशिष इंगोले, सोहेल खान, फैजान खान, शुभम व्यवहारे, रवी खैरे, शंतनू बोरकर, राज जव्हेरी, आकाश काकडे, निखिलेश देऊळकर, वैभव चौके, वैभव शेंडे, विशाल राजगिरी आदी उपस्थित होते.

 

Web Title:  'NSUI' agitation in front of the Dean of GMC Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.