शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आता गावातील घरावर मिळू शकेल कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 10:56 IST

नमुना आठवर बोझा लावता येणार असल्याने ग्रामस्थांना गावातील मालमत्तेवर कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने ‘सात-बारा’ उताऱ्यात आता १२ प्रकारचे बदल केले आहेत. दुसरीकडे ग्रामपंचायत नमुना आठवर कोणताही बोझा चढविण्याबाबत २०१७ मध्ये निर्बंध आणले होते, ते आता उठविण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नमुना आठवर बोझा लावता येणार असल्याने ग्रामस्थांना गावातील मालमत्तेवर कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी एका पत्राद्वारे राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.ग्रामपंचायत नमुना आठ ८ हा मालकी हक्काचा पुरावा(रेकॉर्ड आॅफ राईट) नाही करवसूलीचे शेरे कोष्टक/नोंदवही असून त्यावर विविध संस्थांचे भार कर्ज चढविता येणार नाही, असे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ६ डिसेंबर २०१७ रोजी दिले होते. या आदेशामुळे गावातील मालमत्तेवर ग्रामस्थांना कर्ज मिळणे अशक्य झाले होते. कोरोनाच्या काळामध्ये उत्पन्नाची साधने कमी होत असून, अनेकांना कर्जासाठी उंबरठे झिजवावे लागत आहे. गावामध्ये मोठे घर असूनही कर्जासाठी ते गहाण टाकणे शक्य होत नव्हते. त्यामुळे नमुना आठवर बोझा चढविण्याबाबतची मागणी ग्रामीण भागातून होती. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने यासंदर्भात निर्णय घेऊन ३ सप्टेंबर २०२० रोजी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना एक पत्र पाठवून यापुढे नमुना आठवर भार, कर्ज, बोझा चढविण्याची परवानगी दिली. नमुना आठ हा मालकी हक्क दर्शविणारा दस्तावेज नसला तरी त्यावर मालकाच्या नावाची नोंद असते, त्यामुळे ग्रामविकास विभागाने कर्जासाठी बोझा चढविण्याची परवानगी दिली आहे.बँका, पतसंस्थांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बोझाची माहिती द्यावी४नमुना आठवर केवळ घरातील कर्त्या पुरुषाच्याच नावाची नोंद असते. त्यामुळे बरेचदा कुटुंब प्रमुख या मालमत्तेवर कर्ज उचलतो. पतसंस्था, बँकाही नमुना आठवरच बोझा चढवून कर्ज देत असत. अशा कर्जाचे हप्ते थकल्यावर बँकांकडून वसुलीचा तगादा लावल्यावर घरातील इतरांना या कर्जाबाबत माहिती मिळत होती. त्यामुळे नमुना आठ ही केवळ कर आकारणीची नोंदवही ठेवण्याबाबतचा निर्णय महायुती शासनाने घेतला होता. या निर्णयामुळे सामूहिक मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न मिटला होता; मात्र मालमत्ता असतानाही कर्ज मिळण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे आता नव्या निर्णयानुसार कर्ज मिळण्याची सुलभता झाली असली तरी नमुना आठवर बोझा चढविताना कुटुंबातील इतर सदस्यांनाही बँका, पतसंस्थांनी माहिती देणे आवश्यक ठरते.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँकgram panchayatग्राम पंचायत