शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

टँकरच्या फेऱ्यांवर आता महिलांची नजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:47 IST

गावांमध्ये टँकर पोहोचतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक गावात दोन महिलांवर जबाबदारी देण्यात येत आहे.

अकोला : ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात मोठे घोटाळे होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे गावांमध्ये टँकर पोहोचतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक गावात दोन महिलांवर जबाबदारी देण्यात येत आहे. टँकरची फेरी आल्याच्या प्रमाणपत्रावर त्यांची स्वाक्षरी असल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही, असे निर्देशच राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत.भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो; मात्र हा पुरवठा करताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्या जात असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले. त्यामध्ये टँकर चालकांकडे लॉगबुकच उपलब्ध नाहीत, तर टँकरमध्ये बसविण्यात आलेल्या जीपीएस यंत्रणाही कुचकामी असल्याचे समोर आले आहे. एका ठिकाणी तर टँकर चक्क बेवारस उभा असल्याचेही दिसून आले. या सगळ्या प्रकाराच्या तक्रारीही झाल्या. त्यानंतर जाग आलेल्या शासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठ्याच्या पद्धतीत सुधारणा केली.टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणी होतो की नाही, यावर लक्ष देण्याची पद्धतही आधीच ठरवून देण्यात आली. त्याची आता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार टँकर गावात वेळेवर पोहोचतो की नाही, किती फेºया होतात, किती क्षमतेच्या टँकरमधून होतात, याकडे लक्ष दिल्यास टँकर घोटाळा रोखला जाऊ शकतो. त्यासाठी गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन महिला सदस्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार टँकरच्या फेऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे.- प्रमाणपत्रावर महिलांची स्वाक्षरीप्रत्येक फेरीला टँकर चालक वाहनाचे लॉगबुक तसेच प्रमाणपत्रावर त्या दोन महिलांच्या महिलांची स्वाक्षरी घेणार आहे. त्यावर गावात टँकर पोहोचल्याची तारीख, वेळ नोंद केली जाईल. महिला सदस्यांची स्वाक्षरी नसल्यास टँकरचे देयक अदा केले जाणार नाही. लॉगबुकच्या नोंदीची माहिती प्रत्येक दिवशी पंचायत समिती स्तरावर व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पाठवावी लागणार आहे. टँकरच्या टाकीच्या क्षमतेसह संपूर्ण माहिती टँकरच्या दर्शनी भागात लावली जाणार आहे.- टंचाई कक्षही सतर्क राहणार!जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षाकडून टँकरची जीपीएस प्रणाली अद्ययावत आहे की नाही, हे तपासले जाईल. प्रत्येक टँकरवर जीपीएस कार्यरत करण्याचेही बजावण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई