शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:34 IST

वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे.

ठळक मुद्देराज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी सेंटर सुरू करण्यात येणार. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.इतर नॉन कम्युनिकेबल आजारांचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

- प्रवीण खेतेअकोला: कॅन्सरमुळे दरवर्षी २५ टक्के लोकांचा मृत्यू होत असून, कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजाराच्या अज्ञानामुळे वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी सेंटर सुरू करण्यात येणार असून, आरोग्य विभाग तयारीला लागले आहे.कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या चार विकारांमुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामधील २५ टक्के रुग्ण कॅन्सरचे असतात. कॅन्सर झाल्याचे लवकर लक्षात न आल्याने किंवा अज्ञानामुळे त्याच्यावर उशिरा उपचार सुरू होत असल्याने या आजारामुळे मृत्यूदर वाढला आहे. विशेष करून महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, गर्भाशय आणि स्तन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. कॅन्सरमुळे वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावा या अनुषंगाने राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. सन २०२० पासून राज्यभरातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एनसीडी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात प्रशिक्षक निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत असून, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.या आजारांचेही होईल स्क्रिनिंगकॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, डोळ््यांचे आजार, हृदयविकार यासह इतर नॉन कम्युनिकेबल आजारांचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.प्राथमिक स्तरावर उपक्रमास प्रारंभअकोल्यासह राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये या उपक्रमास प्राथमिक स्तरावर सुरुवात झाली आहे. विविध उपक्रमांतर्गत रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत असून, या आजाराची लक्षणे आढळल्यास संबंधितांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आली.कोण करू शकते तपासणी?या उपक्रमांतर्गत प्रत्येक व्यक्ती आरोग्याची नि:शुल्क तपासणी करू शकते. त्यामुळे कुठल्याही आजाराविषयी मनात शंका असल्यास प्रत्येकाने पीएचसीमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.विभागीय स्तरावर प्रशिक्षकांची निर्मिती करण्यात आली असून, जिल्हा स्तरावरदेखील प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. यांच्यामार्फत राज्यभरातील पीएचसी केंद्रावर विविध आजारांची प्राथमिक तपासणी करून आजारांचे निदान करण्यात येणार आहे. अकोल्यात या उपक्रमास सुरुवात झाली आहे.- डॉ. विजय जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यcancerकर्करोग