शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आता घरोघरी जाणार महावितरणचे फिरते वीज भरणा केंद्र

By atul.jaiswal | Updated: June 18, 2018 17:55 IST

अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देबार्शीटाकळी व अकोट उपविभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. बार्शीटाकळी उपविभागाकरीता सोमवारी मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.उर्वरित जिल्ह्यात या सुविधेची व्याप्ती वाढविण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या अकोला मंडळातील बार्शीटाकळी व अकोट उपविभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. बार्शीटाकळी उपविभागाकरीता सोमवारी मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीजबिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या उपविभागामधील साप्ताहीक बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून, या फिरत्या विज भरणा केंद्राामध्ये इंटरनेट, संगणक आणि प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय या वाहनात ग्राहकांना माहिती मिळण्यासाठी उद्घोषणा करण्याची सुविधाही यामध्ये उपलब्ध राहणार आहे. अकोट आणि बाशीर्टाकळी उपविभागातील वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुर्मिळ वस्ती आणि दुर्गम भागातील गावे तसेच दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेल्या गावांमध्ये हे फिरते केंद्र जाणार आहे. ज्या गावातील वीजबिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही ही मोबाईल व्हॅन फिरविल्या जाणार आहे.मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅनचा शुभारंभबार्शीटाकळी उपविभागाकरीता फिरत्या वीज बिल भरणा केंद्राचा शुभारंभ अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते फीत कापून विद्युत भवन येथे करण्यात आला. यावेळी उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये,प्रणाली विश्लेषक सचिन राठोड उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे,जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपअभियंता विनोद सोनटक्के, काळे, उपव्यवस्थापक प्रमोद कांबळे, शंकर परचाके आणि गुरुमितसिंह गोसल, यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लवकरच अकोट उपविभागाकरिता सुद्धा वीजबिल भरणा मोबाईल व्हॅन सुरु करण्यात येणार आहे.जिल्हाभरात उपक्रम राबविण्याचा विचारप्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या सुविधेला वीज ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा तीन महिन्यांनंतर घेण्यात येणार आहे. वीज ग्राहकांकडून मिळणाºया प्रतिसादानुसार त्या ठिकाणी ही सुविधा पुढे सुरु ठेवण्याबाबत, तसेच उर्वरित जिल्ह्यात या सुविधेची व्याप्ती वाढविण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Vidhyut Bhavanअकोला विद्युत भवन