शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:43 IST

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे.

- संजय खांडेकर

 अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे. यासाठी प्रवाशाला ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज मोजावे लागणार आहे. या प्रणालीमुळे आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करणे सोपे झाले आहे.जर आपण उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करीत असाल आणि बजेटची समस्या असेल तर घाबरण्याचे काही कारण कारण नाही. आयआरसीटीसीने अभिनव अशी योजना आणली आहे. त्यात १४ दिवसांच्या उधारीवर तुम्हाला तिकीट बुक करता येते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरील प्रवाशांना ही क्रेडिट सुविधा दिली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करण्याच्या केवळ पाच दिवस आधी तिकीट बुक करणे गरजेचे आहे. तिकीट बुक केल्यानंतर १४ दिवसांत ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यावर ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज देणे सक्तीचे आहे. या व्यवस्थेसाठी आयआरसीटीसीने मुंबईच्या एका कंपनी ईपेलेटरसोबत करार केला आहे. जर १४ दिवसांत प्रवाशाने तिकिटाची रक्कम भरली नाही तर आयआरसीटीसी त्या प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत दंड वसूल करू शकते. जर दुसऱ्यांदादेखील प्रवाशाने हीच वागणूक ठेवली तर त्याला या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.बँक लोनप्रमाणे सुविधाएखादी वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकास लोन दिले जाते. यासाठी बँक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आता प्रवासासाठीदेखील लोन दिले जात आहे. त्यासाठी करार केला जातो. आयआरसीटीसीतून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशाला कितीची क्रेडिट दिली गेली पाहिजे हे त्या व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री, डिजिटल फुटप्रिंट, डिवाइस इन्फर्मेशन आणि आॅनलाइन विक्री व्यवहारावर ठरणार आहे. असे करता येईल आरक्षणया सेवेसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन आधी अधिकृत रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर व्यक्तिगत आवश्यक असलेली माहिती त्यावर द्यावी लागेल. त्यानंतर पर्याय दिले जातात. त्याची निवड केल्यानंतर ई-पे-लेटर खात्यात लॉगीन करावे लागते. त्यात तिकिट बुकिंगची रक्कम निश्चित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे