शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Akola: कुख्यात गुंड पप्या खानला ‘एमपीडीए’चा दणका, जिल्हा पाेलिस अधीक्षकांची गावगुडांवर वक्रदृष्टी

By आशीष गावंडे | Updated: May 21, 2024 22:46 IST

Akola Crime News: शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे.

- आशिष गावंडे अकोला - शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. जुने शहरातील हमजा प्लाॅट येथील कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पप्या अहेमद खान (२६)याच्याविराेधात ‘एमपीडीए’नुसार कारवाइ करीत त्याला एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाइ मंगळवारी पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जुने शहर पाेलिसांनी केली. 

जुने शहरातील हमजा प्लाॅट येथील कुख्यात गुंड शाकीर खान उर्फ पप्या अहेमद खान (२६)याच्याविराेधात यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी दूखापत करणे, भूखंड, घरांवर अतिक्रमण करणे, चोरी करणे, बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणे,जीवे मारण्याची धमकी देणे असे विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करून ताे जुमानत नव्हता. त्यामुळे कुख्यात शाकीर खानला स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मे राेजी मंजूरी दिली हाेती. ही कारवाइ ‘एसपी’सिंह यांच्या निर्देशानुसार ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, ‘पीएसआय’आशिष शिंदे, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकॉ. उदय शुक्ला तसेच जुने शहर पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ‘एपीआय’रविंद्र लांडे यांनी केली. 

आराेपी झाला हाेता फरारपाेलिस यंत्रणेने आपल्या विराेधात ‘एमपीडीए’ची कारवाइ केल्याची कुणकुण लागताच कुख्यात गुंड शाकीर खान फरार झाला हाेता. परंतु पाेलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत २१ मे राेजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. आराेपीला अटक केल्यापासून त्याच्या स्थानबध्दतेचा कालावधी सुरू झाला आहे. पाच महिन्यांत ‘एमपीडीए’अंतर्गत तब्बल १४ जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे,हे येथे उल्लेखनिय.

सर्वसामान्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवणे, खंडणी उकळणे,परिसरात दहशत निर्माण करणे व भूखंड हडपणाऱ्या गावगुंडांनी वेळीच त्यांच्या कृतीला पायबंद घालावा. अन्यथा कारवाइ हाेणारच,हे गृहीत धरावे. -बच्चन सिंह,जिल्हा पाेलिस अधीक्षक

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी