शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएलओ’च्या कामासाठी शिक्षकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:41 IST

शिक्षकांना कोणतीच अशैक्षणिक कामे देता येत नसतानाही जिल्हय़ात बुथ लेवल ऑफिसरची कामे न केल्यास शिक्षकांना शिस्तभंग कारवाईच्या नोटीसा जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षक बिथरले आहेत. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. पाटील यांना निवेदन दिल्यानंतरही नोटीसा बजावण्यात येत आहेत. 

ठळक मुद्देकारवाईच्या धाकाने शिक्षक बिथरले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षकांना कोणतीच अशैक्षणिक कामे देता येत नसतानाही जिल्हय़ात बुथ लेवल ऑफिसरची कामे न केल्यास शिक्षकांना शिस्तभंग कारवाईच्या नोटीसा जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षक बिथरले आहेत. विशेष म्हणजे, पालकमंत्री डॉ. पाटील यांना निवेदन दिल्यानंतरही नोटीसा बजावण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून बीएलओचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात अंतरिम आदेशात शिक्षकांना ही कामे देण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासोबतच शिक्षण हक्क अधिनियम २00९ मध्येही शिक्षकांना लोकसभा, विधानसभा आणि नैसर्गिक आपत्ती निवारणाशिवाय कोणतेही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. शासनानेही १८ जून २0१0 रोजीच्या निर्णयानुसार शिक्षकांकडील संपूर्ण अशैक्षणिक कामे काढून घेऊन त्यांना अध्यापनाव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगानेही शिक्षक संवर्गाला वगळले आहे. तरीही अकोला जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिक्षकांना बीएलओ म्हणून नेमणूक करीत आहेत. ही कामे देण्यात येऊ नये, यासाठी शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनाही निवेदन दिले. त्यांनीही निवडणूक अधिकार्‍यांना पत्र देत शिक्षकांची मागणी ग्राह्य धरण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही नोटीसा दिल्या जात आहेत. हा प्रकार बंद करावा, अशी मागणी समन्वय समितीचे नामदेव फाले, देवानंद मोरे, शशिकांत गायकवाड, अरविंद गाडगे, एम.एम. तायडे, रजनीश ठाकरे, नितीन बंडावार, राजेश्‍वर सिरस्कार, वि.भा. पाटील यांनी केली आहे. 

काम नाकारल्यास गंभीर स्वरूपाची कारवाईजिल्ह्यात सध्या १ जानेवारी २0१८ या दिनांकावर आधारित मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकार्‍यांकडून हा कार्यक्रम राबवण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. मात्र, शिक्षकांकडून ही कामे केली जात नाहीत. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून लोकप्रतिनिधी अधिनियम व महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा असलेल्या नोटीसा त्यांना बजावल्या जात आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकAkola cityअकोला शहर