शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:26 IST

अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते.

अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते. सदर ट्रकमध्ये रेतीची अवैधरीत्या तसेच ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने व शहर वाहतूक शाखेने या वाहनांची तपासणी केली असून, या ट्रकचा चालक व मालकांना नोटीस बजावून हजर राहण्याचा आदेश दिला आहे.मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रेती वाहतुकीच्या रॉयल्टीच्या आधारावर शेगाव येथील रहिवासी सुरेंद्र देवराव सावळे यांच्या मालकीच्या एम एच २८ बीबी ०१४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेतीची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख आणि जुने शहरचे तत्कालीन ठाणेदार अन्वर शेख यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत रेतीची ओव्हरलोड वाहतूक करीत असलेल्या या ट्रकला पकडले होते. त्यानंतर सदर ट्रक उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तपासणीसाठी पाठविला असता या ट्रकमधून रेतीची वाहतूक ओव्हरलोड असल्याचे समोर आले. त्यानंतर हा ट्रक वाहतूक शाखेच्या ताब्यात देण्यात आला असून, वाहतूक शाखेने या ट्रकच्या चालकास मालकास २१ जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती. महसूल विभागाची हप्तेखोरीमध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील रॉयल्टीच्या आधारे जिल्ह्यात रेती माफियांनी धुडगूस घातला आहे. बाळापूर तालुक्यातून रेतीची अवैधरीत्या सर्रास वाहतूक सुरू असताना येथील महसूल प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याने माफियांकडून मोठी हप्तेखोरी सुरू असल्याचे वास्तव आहे. पोलिसांनी वारंवार कारवाया केल्यानंतर महसूल विभागाने मात्र रेती माफियांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूPoliceपोलिस