शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विभागातील गोदामात कार्यरत कामगारांना मोबदला देण्यासाठी कंत्राटदाराला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:18 IST

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अकोला विभागातील गोदामात  कार्यरत कामगारांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे दर अकोला माथाडी  मंडळाच्या अध्यक्षांनी ठरवल्यानंतर त्या आदेशाला कामगार मंत्र्यांनी दिलेली  स्थगिती उठविण्यात आली.

ठळक मुद्देकामगार मंत्र्यांनी दहा महिन्यांनंतर उठविली स्थगिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अकोला विभागातील गोदामात  कार्यरत कामगारांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे दर अकोला माथाडी  मंडळाच्या अध्यक्षांनी ठरवल्यानंतर त्या आदेशाला कामगार मंत्र्यांनी दिलेली  स्थगिती उठविण्यात आली. त्यानुसार ठरलेल्या दराप्रमाणे कामगारांना मोबदला  देण्यासाठी माथाडी मंडळाने कंत्राटदाराला नोटीस बजावली. त्याचवेळी  कंत्राटदाराने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कळवत कामगारांना पुरेशा  मोबदल्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, मोबदला  दराच्या आदेशाला मंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीविरुद्धच प्रकरण न्यायालयात सुरू  आहे.अकोला विभागातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील  कामगारांना कायद्यानुसार कामाचा मोबदला मिळावा, यासाठी अकोला विभाग  माथाडी मंडळ अध्यक्षांनी ४ जानेवारी २0१७ रोजी कायदेशीर आदेश देत दर  ठरवून दिले. त्यामध्ये कामगारांचे हित साधण्यात आले; मात्र त्या आदेशाला  आव्हान देणारी याचिका कामगार कंत्राटदार मे. जोशी फ्रेट कॅरिअर्स यांनी  कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्याकडे दाखल केली. मंत्र्यांनी १0  जानेवारी रोजी माथाडी मंडळ अध्यक्षांनी ठरवून दिलेल्या दराच्या आदेशाला स् थगिती दिली. कामगारांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी  कामगार मंडळाने मंत्र्यांच्या स्थगिती आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नाग पूर खंडपीठात आव्हान दिले. दरम्यान, कामगार मंत्र्यांनी दिलेले स्थगिती  आदेश १६ नोव्हेंबर रोजी रद्द केले. त्यामुळे माथाडी मंडळ अध्यक्षांनी  ठरविलेल्या कामाच्या दराचे आदेश कायम झाले. त्यानुसार अकोला माथाडी  मंडळाचे निरीक्षकांनी कंत्राटदाराला नोटीस देत आदेशात ठरलेल्या दराप्रमाणे  रक्कम मंडळाकडे जमा करण्याचे बजावले. कामगारांना आतापर्यंत प्रतिकट्टा  १ रुपये ५0 पैसे अधिक ३0 टक्के लेव्हीची रक्कम अशी रक्कम  कंत्राटदाराकडून दिली जात आहे. आता ती ३ रुपये ४२ पैसे अधिक लेव्हीची  रक्कम मिळून ४ रुपये ४४ पैसे प्रमाणे द्यावी लागणार आहे. मंडळाने दिलेल्या  नोटीसला कंत्राटदाराने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे हास्यास्पद उत्तर देत  टाळण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

मंत्र्यांनी स्थगिती रद्द करताच मोबदल्याची रक्कम भरण्यासाठी कंत्राटदाराला  नोटीस दिली. उत्तरामध्ये कंत्राटदाराने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे म्हटले  आहे. त्यामुळे जुन्याच दराने कंत्राटदाराकडून रक्कम स्वीकारून कामगारांना  ती अंडर प्रोटेस्ट दिली जात आहे. - दिलीप नाकाडे, निरीक्षक, अकोला माथाडी मंडळ. 

कामगार मंत्र्यांनी आदेशाला दिलेली स्थगिती उठविल्याने त्यांचे नाव याचिकेतून  वगळण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले. आता मंडळाने दराच्या  आदेशानुसार कामगारांचा मोबदला वसूल करण्यात कोणतीही अडचण नाही;  मात्र कत्राटदाकडून टाळाटाळ होत आहे. ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास  आणून दिली जाईल. - डॉ. हरीश धुरट, उपाध्यक्ष, राज्य हमाल-मापाडी मंडळ.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmarket yardमार्केट यार्ड