शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने बजावल्या १६०० दुकानांना नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 13:48 IST

अकोला: जाहिरातींच्या माध्यमातून खिसे जड करणाऱ्या खासगी कंपन्यांचे शहरातील दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर फलक झळकताना दिसून येतात. अशा फलकांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेत महापालिका प्रशासनाने आजवर १६०० पेक्षा अधिक दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठानला नोटीस बजावल्या आहेत.

-  आशिष गावंडेअकोला: जाहिरातींच्या माध्यमातून खिसे जड करणाऱ्या खासगी कंपन्यांचे शहरातील दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर फलक झळकताना दिसून येतात. अशा फलकांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेत महापालिका प्रशासनाने आजवर १६०० पेक्षा अधिक दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठानला नोटीस बजावल्या आहेत. उत्पन्न वाढीसाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य अकोलेकरांकडून समर्थन केले जात असतानाच दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून आडकाठी घातल्या जात असल्याची माहिती आहे.शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने अनधिकृत होर्डिंग-फलक उभारल्या जात असल्याने संपूर्ण शहराचे विदू्रपीकरण झाले आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खासगी कंपन्या व एजन्सी संचालकांनी शहरातील मोक्याच्या जागांवर कब्जा केला आहे. अनधिकृत होर्डिंगमुळे महापालिकेला वर्षाकाठी लाखो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. होर्डिंगच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने शहरातील मोक्याच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्या बदल्यात मनपाला वर्षाकाठी ३८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. उत्पन्नाच्या सबबीखाली अतिक्रमण विभागाने चक्क मुख्य रस्ते, मुख्य चौकांत होर्डिंगसाठी जागांची खिरापत वाटली. या प्रकारावर नियंत्रण नसल्यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. आगामी काही दिवसांत प्रशासनाकडून ठरावीक जागेवर होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होईल, ही बाब गृहीत धरून प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी शहरातील दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठानांवर लावल्या जाणाºया कंपन्यांच्या फलकांवरही शुल्क आकारणीचा निर्णय घेतला. त्यानुषंगाने अतिक्रमण विभागाने मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आजवर १६०० नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती आहे.कंपन्यांचा सुळसुळाटशहराच्या कानाकोपºयात खासगी कंपन्यांच्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील प्रतिष्ठाने, दुकानांच्या माध्यमातून विविध कंपन्या उत्पादनांची जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यापुढे खासगी कंपन्यांचे फलक लावण्यासाठी व्यावसायिकांना मनपाकडे शुल्काचा भरणा करावा लागेल.शुल्क आकारण्यास भाजपचा विरोधप्रशासनाने सुधारित करवाढ केल्यानंतर आता अकोलेकरांवर अतिरिक्त शुल्काचा भार नकोच, अशी भूमिका घेत सत्ताधारी भाजपाने प्रशासनाच्या निर्णयाला २२ फेब्रुवारीच्या स्थगित सर्वसाधारण सभेत जोरदार विरोध दर्शविला होता. त्यानंतर २७ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय सभेत उत्पन्नाचे अनेक स्रोत असताना प्रशासन कोणताही निर्णय घेत नसल्याचे खापर सत्तापक्षातील नगरसेवकांनी प्रशासनावर फोडले होते, हे येथे उल्लेखनीय.

वैध-अवैध होर्डिंगची सळमिसळमहापालिकेतील अतिक्रमण विभागाच्या दप्तरी ५३३ पेक्षा जास्त ठिकाणी होर्डिंग-फलक उभारण्यात आल्याची नोंद आहे. यामध्ये मनपाच्या विद्युत खांबांवरील बोर्डांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त खासगी कंपन्या व एजन्सी संचालकांनी वैध-अवैध होर्डिंगची सळमिसळ करून जागा दिसेल त्या ठिकाणी होर्डिंग उभारल्याची माहिती आहे. यामुळे मनपाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका