शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसबरोबरची आघाडीची शक्यता संपली, सर्व मतदारसंघांत उमेदवार देणार- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 10:54 IST

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याची माहिती दिली आहे.

अकोलाः भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसला आम्ही 22 जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो त्यांनी मान्य केला नाही. काँग्रेसनं दिलेले सर्व प्रस्ताव आम्हाला अमान्य आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. 15 तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 

लातूरचे अण्णाराव पाटील, साताऱ्याचे लक्ष्मण माने हे काँग्रेसशी आघाडीसंदर्भात चर्चा करत होते. 22 जागी आम्ही उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेस पक्षाला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला. परंतु तो काँग्रेसनं स्वीकारला नाही.  लोकशाहीचं सामाजीकरण झालं पाहिजे. लोकशाहीच्या सामाजीकरणाचा एक भाग म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला उमेदवारी देणं हे राजकीय पक्षांचं कर्तव्य आहे.ज्या 22 जागी उमेदवार दिले आहेत, ते माघार घेणार नसल्याचं काँग्रेसला सांगितलं होतं. काँग्रेसनं ते उमेदवार स्वीकारावेत किंवा वंचित बहुजन आघाडीऐवजी काँग्रेसनं आपला एबी फॉर्म लावावा, अशी ऑफर आम्ही काँग्रेस पक्षाला दिली होती. काँग्रेस आमचे 22 उमेदवार स्वीकारण्यास तयार नाही. काँग्रेसकडून होकार न आल्यानं या चर्चा पुढे जातील, असं वाटत नाही. उर्वरित उमेदवारांचा निर्णय करून 15 तारखेला 48 उमेदवारांची यादी जाहीर करू, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर