शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अफवांवर विश्वास न ठेवता मुलांना द्या गोवर, रुबेला लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:58 IST

अकोला : लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते १५ वर्षांआतील प्रत्येक बालकाला रुबेला व गोवरची दुहेरी लस द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी केले.

अकोला : लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या नऊ महिने ते १५ वर्षांआतील प्रत्येक बालकाला रुबेला व गोवरची दुहेरी लस द्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी केले. ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याने यासंदर्भात पसरविण्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.२७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रुबेला व गोवर लसीकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख व विलास खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यंदा पहिल्यांदाच नऊ महिने ते १५ वर्षांआतील बालकांना २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेलाचे दुहेरी लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख १२ हजार ७२६ बालकांना, तर मनपा क्षेत्रात १ लाख १५ हजार ४१६ बालकांना लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील १ हजार ६१८ शाळांमध्ये, तर महापालिका कार्यक्षेत्रातील १९५ शाळा आणि ८३४ अंगणवाड्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. रुबेला आणि गोवर हे विषाणूपासून होणारे आजार आहेत. गोवर या आजारात रुग्णास ताप, पुरळ, सर्दी, खोकला किंवा डोळे लाल होणे यापैकी किमान एक लक्षण दिसून येते. गोवर झालेल्या रुग्णास न्युमोनिया, अतिसार किंवा मेंदूज्वर यापैकी आजार होऊ शकतात. उपचार न मिळाल्यास रु ग्णाचा मृत्यू होऊ शकतो. भारतात दरवर्षी जवळपास ५० हजार रुग्णांचा या आजाराने मृत्यू होतो, तर रुबेला या आजारामुळे गर्भवतींना गर्भपात होऊ शकतो. जन्माला आलेल्या बाळास मोतीबिंदू, बहिरेपणा, वाढ खुंटणे, यकृत, प्लिहाचे आजार, हृदयविकार आदी आजार होण्याची शक्यता असते. रुबेलाचा धोका गर्भवतींनाच असला, तरी ही लस केवळ मुलींनाच नाही, तर मुलांनाही दिली जाते.लसीकरणापासून बाळ पूर्णत: सुरक्षितएशियाड व राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांना प्रशिक्षणरिअ‍ॅक्शन झाल्यास तत्काळ उपचार सुविधालसीकरणानंतर डाव्या हाताला लावणार शाई व प्रमाणपत्र वितरणलसीकरणानंतर ३० मिनिटे बालकांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य