शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खोदकाम केले, जलवाहिनीचा पत्ता नाही; पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:32 IST

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे.

अकोला: महापालिकेच्या दप्तरी पहिला क्रमांक असणाऱ्या नायगाव प्रभागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे. मनपाला मंजूर झालेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले. या भागात जलवाहिनीच नसल्यामुळे महिलांसह लहान मुलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याचे दिसून आले.महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा भाग म्हणून नायगाव प्रभागाकडे पाहिल्या जाते. संपूर्ण प्रभागाचा स्लम एरियात समावेश होत असल्याने या भागात विकास कामांना मोठा वाव आहे; परंतु प्रभागाचे चारही नगरसेवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, मनपात सत्ता भाजपची आहे. त्यामुळे साहजिकच नायगावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप सातत्याने होतो. नायगावची एकूणच स्थिती लक्षात घेतली असता, काँग्रेस नगरसेवकांच्या आरोपात तथ्य दिसून येते. नायगावातील वाकापूर रस्ता, इदगाह परिसरात पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्यामुळे लहान मुलांसह महिलांवर पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आले. या भागात जलवाहिनीसाठी अर्धवट खोदकाम करण्यात आले. नंतर महापालिकेचा कोणताही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचे महिलांनी सांगितले. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कार्यकाळात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आली होती. शौचालयासाठी पाणी हवे म्हणून सबमर्सिबल पंप बसविण्यात आला. त्यावर नागरिकांनी नळाचे स्टॅन्ड लावले असून, याद्वारे तात्पुरता तोडगा काढण्यात आला. नायगाव परिसराकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचा आरोप महिलांनी केला. गुंठेवारी जमिनीवर कर आकारणी केली; परंतु पाणीपुरवठा, स्वच्छतेचा मागमूगसही नसल्याचे शेख शौकत शेख गफूर यांनी सांगितले. सबमर्सिबल पंपावरील साहित्याची वारंवार चोरी होते. त्यावेळी वर्गणी जमा करून सबमर्सिबलचे साहित्य आणल्या जात असल्याचे शेख मुख्तार यांनी सांगितले. जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना गोडे पाणी मिळत नसल्याची तक्रार सईदा बी परवीन यांनी केली. एकाच सबमर्सिबल पंपावर परिसरातील नागरिकांची गर्दी होते. त्यातच पाण्याचा दाब कमी असल्याने एक हंडा भरण्यासाठी किमान २० मिनिट अवधी लागत असल्याचे सायरा बी, जैनबबी, यासीन परवीन, अंजूम परवीन, रेहाना परवीन यांनी सांगितले. प्रभागात काँग्रेसचे तीन व एक राष्ट्रवादीचे नगरसेवक असूनही आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सलमा फिरदोस यांनी सांगितले.सतत पाठपुरावा करतोय!नगरसेवक अब्दुल रहीम अ. कादर यांना विचारणा केली असता, दाट लोकवस्तीच्या भागात पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी मनपा प्रशासनासह महापौरांकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई