शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार नाहीत, केवळ सूचना फलकांवर; अप्रत्यक्ष साफसफाईसाठी असतात कामावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 10:29 IST

No child labour : सर्वेक्षणात काही मालकांवर विविध पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अकाेला : शहरातील हॉटेल, बांधकाम क्षेत्र आणि कारखान्यात बालकामगार ठेवले जात नाही, असे बोर्ड लावण्यात आले आहेत. असे असले तरी बहुतांश ठिकाणी कुठे साफसफाईसाठी, तर कुठे बांधकाम मजूर म्हणून बालकामगार काम करत असल्याचे दिसून येते. ‘ऑपरेशन मुस्कान २०२१’ या मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात काही मालकांवर विविध पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहान वयातच मुलांना कामाला पाठविले जाते. मुलांना कामाला पाठवल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही, शिवाय काही ठिकाणी धोकादायक स्थितीमध्ये काम करावे लागते. त्यामध्ये लहान मुलांचा जीव जाण्याची शक्यता असते. आर्थिक उत्पन्नासाठी लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६ नुसार गुन्हा आहे.

 

वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बालकामगारांना पकडून बालकल्याण समितीसमोर हजर केले जाते. समिती बालकामगारांची चौकशी करून त्यांना शाळेत पाठवण्याच्या अटीवर पालकांच्या ताब्यात देतात.

 

बालकामगार प्रतिबंधक अधिनियम काय सांगतो..

० ते १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो.

० नियमभंग करणाऱ्यांना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत १० ते २० हजार रुपये दंड होऊ शकतो. १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेषतः, १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो.

० दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे.

‘येथे बालकामगार काम करीत नाहीत...’ पाटी केवळ नावालाच

पूर्वभाग

० शहरातील मध्यवर्ती भागात व हद्दवाढीमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकामांवर अनेक बालकामगार आढळून आले आहेत.

० शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल्समध्येही ‘ऑपरेशन मुस्कान २०२१’ अंतर्गत सर्व्हे करण्यात आला. काही हॉटेलमालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

० शहरातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल, बांधकाम व चहा कॅन्टीन आदी ठिकाणी बालकामगार आढळून आले आहेत. संबंधित मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

० एमआयडीसीत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये अनेक ठिकाणी बालकामगार आढळून आले आहेत. मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

गेल्या दोन वर्षांत ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत बालकामगार ठेवल्याप्रकरणी मालकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, मुस्कान पथक व अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणणे हा एकमेव उद्देश आहे.

- शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी